Join us
Daily Top 2Weekly Top 5

​श्रीदेवींना पत्नी मानणा-या चाहत्याने केले मुंडण! लिहिली होती तीन हजारांवर पत्रे!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 13:37 IST

बॉलिवूडची ‘चांदनी’ श्रीदेवी यांच्या अकाली निधनाने सगळ्यांच मोठा धक्का बसला आहे. चाहते तर अद्यापही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. श्रीदेवी ...

बॉलिवूडची ‘चांदनी’ श्रीदेवी यांच्या अकाली निधनाने सगळ्यांच मोठा धक्का बसला आहे. चाहते तर अद्यापही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दलच्या रोचक बातम्या एक एक करून समोर येत आहेत. ताजी बातमी आहे ती श्रीदेवींच्या एका डाय-हार्ट फॅनची. हा चाहता श्रीदेवींना स्वत:ची पत्नी मानायचा. या चाहत्याचे नाव आहे, ओमप्रकाश मेहरा. मध्यप्रदेशच्या श्योपूरमध्ये राहणा-या ओमप्रकाश यांनी श्रीदेवींच्या निधनानंतर गत रविवारी श्रद्धांजली सभा आयोजित केली आणि याचदरम्यान आपले मुंडन करून घेतले. विशेष म्हणजे, ओमप्रकाश यांनी आपल्या आईच्या श्राद्धादरम्यानही मुंडण केले नव्हते.



शाळेत असताना ओमप्रकाश यांनी श्रीदेवींचा पहिला चित्रपट पाहिला होता. हा चित्रपट पाहिला अन् ओमप्रकाश श्रीदेवींच्या पे्रमात पडले. पुढे तर ओमप्रकाश यांनी श्रीदेवींना मनातून पत्नीचं मानले. हेच कारण आहे की, इतक्या वर्षांनंतरही ओमप्रकाश अविवाहित आहेत. ओमप्रकाश यांनी इतकी वर्षे श्रीदेवींना भेटण्याचे अनेक प्रयत्न केलेत. एक भेट मिळावी म्हूणन श्रीदेवींना तब्बल ३ हजारांवर पत्रे लिहिली. पण ओमप्रकाश यांची इच्छा पूर्ण झाली नाही आणि यातच अचानक त्यांना श्रीदेवींच्या निधनाची बातमी मिळाली. या बातमीने ओमप्रकाश यांना प्रचंड मानसिक धक्का बसला. इतका की, दोन दिवस त्यांनी जेवण-पाणी सोडले. रविवारी त्यांनी श्रीदेवींची श्रद्धांजली सभा आयोजित केली. मी हाच जन्म काय तर पुढचे सात जन्म श्रीदेवींची प्रतीक्षा करेल, असे ओमप्रकाश म्हणाले.

ALSO READ : अशी झाली होती श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची पहिली भेट

गत २४ फेब्रुवारीला दुबईच्या एका हॉटेलात श्रीदेवींनी अंतिम श्वास घेतला. बोनी कपूर यांचा भाचा मोहित मारवाह याच्या विवाहासाठी श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या.  हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला. सुमारे अडीच दिवसांच्या चौकशीनंंतर दुबई पोलिसांनी पार्थिव कुटुंबीयांकडे सोपवले होते. यानंतर २८ फेबु्रवारीला श्रीदेवींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.