दरम्यान विमानतळावरून श्रीदेवी यांचे पार्थिव लोखंडवाला येथील ग्रीन अॅक्रेस येथे घेऊन जाणार आहेत. श्रीदेवी यांच्या पार्थिवासोबत पती बोनी कपूर, दीर संजय कपूर, अनिल कपूर आणि अर्जुन कपूर आहेत. सध्या मुंबई विमानतळावर प्रचंड सुरक्षा तैनात करण्यात आली असून, तेथून बाहेर पडण्यासाठी आणखी अर्धा तास वेळ लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे श्रीदेवी यांच्या दोन्ही मुली जान्हवी आणि खूशी काका अनिल कपूरसोबत विमानतळावर पोहोचल्या आहेत.
पुढील पाच मिनिटातच श्रीदेवी यांचे पार्थिव विमानतळाबाहेर आणण्यात येणार आहे. अभिनेत्री शबाना आझमी, जावेद अख्तर, उद्योगपती अनिल अंबानी विमानतळावर पोहोचले आहेत. दुबई येथून आलेल्या जेट विमानात श्रीदेवी यांच्या पार्थिवासोबत कुटुंबातील ११ सदस्यांचा समावेश आहे. त्यातील सहा सदस्य कपूर परिवारातील आहेत. याच दरम्यान श्रीदेवी यांच्या पार्थिवाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवर madhyamam.com या वेबसाइटचा वॉटरमार्क दिसत आहे. वास्तविक हा फोटो कसा व्हायरल होत आहे, याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.