Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रीदेवीचा मुलीला रागावतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 19:31 IST

श्रीदेवीच्या निधनाला तीन महिने झाले आहेत. परंतु अजूनही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्यांची आठवण काढली जात आहे. आता मुलीला रागवतानाचा त्यांचा एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

श्रीदेवीचे निधन होऊन तीन महिने झाले आहेत. या तीन महिन्यांत बॉलिवूडमधील प्रत्येक छोट्या-मोठ्या इव्हेंटमध्ये श्रीदेवीला स्मरण करण्यात आले. नुकताच श्रीदेवीला ‘मॉम’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मरणोत्तर राष्टÑीय पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार श्रीदेवीचे पती बोनी कपूर आणि मुली जान्हवी व खुशीने स्वीकारला होता. पुरस्कार स्वीकारताना बोनी कपूर चांगलेच भावुक झाल्याचे दिसून आले. दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये श्री एकतर शूटिंग करीत असावी किंवा कोणाला तरी मुलाखत देत असावी असे दिसत आहे. मात्र याचदरम्यान, मुलगी खुशीमध्ये येऊन मॉम श्रीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. मात्र खुशीचा हा खोडकरपणा बघून मॉम श्रीदेवी चांगलीच संतापते. ती तिला रागवताना तेथून जाण्यास सांगते. श्री खुशीला म्हणतेय की, ‘खुशी प्लीज, येथून जा आणि तिकडे जाऊन बस. व्हिडीओमध्ये श्रीसोबत आणखी एक महिला बसलेली दिसत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर खुशी कपूरच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे.  दरम्यान, श्रीदेवीच्या निधनानंतर बोनी कपूर दोन्ही मुलींचा सांभाळ करीत आहेत. वास्तविक श्रीदेवीच्या निधनानंतर बोनी खूपच खचून गेल्याचे दिसून आले होते. मात्र त्यांचा मुलगा अर्जुन कपूरने त्यांना आधार देत दोन्ही सावत्र बहिणींना धीर दिला. वास्तविक श्रीदेवीच्या हयातीत अर्जून आणि श्रीदेवी यांच्यात कधीच ताळमेळ दिसला नाही. परंतु आता अर्जुनने सर्व काही विसरून आपल्या बहिणींना आधार दिला आहे. सध्या तो दोन्ही बहिणींचा खूप सांभाळ करतो. श्रीदेवीचे २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबई येथे निधन झाले होते.