दुबईत श्रीदेवींचे हजारो चाहते आहेत. हे चाहते दुबई फॉरेन्सिक सेंटरबाहेर जमले. दुबईमधील कायद्याप्रमाणे कुठल्याही परदेशी नागरिकाचा अचानक मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यूचा तपास केला जातो. त्यासाठी मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाते. तत्पूर्वी पोलिसांना कागदोपत्री सोपस्कारही पूर्ण करावे लागतात. त्याअंतर्गत संबंधित देशाच्या दुतावासाला माहिती दिली जाते. त्यानंतर दुतावासाकडून मृत व्यक्तीचा पासपोर्ट रद्द केला जातो आणि नो आॅब्जेक्शन सर्टिफिकेट जारी केले जाते. पोस्टमॉर्टेमनंतर येणाºया अहवालात मृत्यूचे कारण नमूद केले जाते. तसेच या कागदपत्रांवर पोलिसांची मोहोर लावलेली असते. हे सगळे कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्या नंतर श्रीदेवींचा मृतदेह मुंबईत आणता येईल. रात्री उशीरापर्यंत तो मुंबईत येईल, अशी अपेक्षा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या सोमवारी श्रीदेवींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
ALSO READ : एक दुर्दैवी योगायोग! अर्जुनप्रमाणेच जान्हवीचा ‘डेब्यू’ पाहण्यासाठीही आई नाही!!
श्रीदेवींनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. ‘कंदन करुनई’ या तामिळ सिनेमात त्या बालकलाकार म्हणून झळकली होत्या. अनेक पौराणिक सिनेमांमध्येही त्यांनी काम केले. १९९६ साली श्रीदेवी दिग्दर्शक बोनी कपूरबरोबर यांच्यासोबत लग्नबंधनात अडकल्या. लग्नानंतर श्रीदेवींनी बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. पण अलीकडे ‘इंग्लिश -विंग्लिश’ आणि ‘मॉम’ या चित्रपटाद्वारे त्या पुन्हा बॉलिवूडमध्ये परतल्या होत्या. अभिनयासाठी श्रीदेवींची चर्चा झाली, त्याचप्रमाणे त्यांच्या पर्सनल लाईफमुळेही त्या चर्चेत राहिल्या.