Join us
Daily Top 2Weekly Top 5

​श्रीदेवींची ‘ही’ जाहिरात ठरली अखेरची! वेगाने होतेय व्हायरल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 13:22 IST

श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांचे अखेरचे फोटो, व्हिडिओ, त्यांचा अखेरचा डान्स असे सगळे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातच श्रीदेवींची अखेरची एक जाहिरातही वेगाने व्हायरल होत आहे.

श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांचे अखेरचे फोटो, व्हिडिओ, त्यांचा अखेरचा डान्स असे सगळे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातच श्रीदेवींची अखेरची एक जाहिरातही वेगाने व्हायरल होत आहे. इंडियन ब्रान्ड चिंग्सच्या या जाहिरातीत श्रीदेवींचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळतोय. तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल पण श्रीदेवी चिंग्सच्या ब्रान्ड अ‍ॅम्बिसीडर होत्या.  या जाहिरातीत श्रीदेवी आईच्या भूमिकेत आहेत. श्रीदेवी या खºया आयुष्यातही एक ‘कूल मॉम’ होत्या. या जाहिरातीतही त्यांचे हेच रूप पाहायला मिळते आहे. यात त्या ब्रिटीश इंडियन रॅपर आणि हिप हॉप सिंगर हार्ड कौरच्या ट्यून्सवर थिरकताना दिसताहेत. श्रीदेवींची ही अखेरची जाहिरात पाहून अनेकांना आपल्या भावना आवरणे कठीण होईल. कारण ही ‘कूल मॉम’ आता पुन्हा कधीच दिसणारी नाही.ALSO READ : श्रीदेवीच्या निधनाच्या धक्क्याने कंगना राणौतला भरला ताप! थांबवावे लागले ‘मणिकर्णिका’चे शूटींग!!शनिवारी वयाच्या ५४ व्या वर्षी श्रीदेवींचे निधन झाले. आधी त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे सांगण्यात आले होते. पण पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मात्र वेगळेच सत्य बाहेर आजे.  दुबईच्या हॉटेलात बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये उघड झाले. त्यांच्या शरीरात अल्कोहोलचे अंशही सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर दुबई पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. त्यामुळे श्रीदेवींचे पार्थिव ताब्यात मिळण्यास आणखी विलंब होऊ शकतो. आज मंगळवारी श्रीदेवींचे पार्थिव भारतात येऊ शकते, असे मानले जात आहे. अर्थात अद्यापही यासंदर्भात निश्चित माहिती मिळू शकली नाही. मुंबईत श्रीदेवींचे लाखो चाहते, त्यांच्या अंतिम दर्शनाची प्रतीक्षा करत आहेत. श्रीदेवींचे पार्थिव भारतात आल्यानंतर ते त्यांच्या ‘भाग्य’बंगल्यात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल, असे कळतेय.