प्रिया राजवंश
‘हीर रांझा’, ‘हंसते जख्म’, ‘कुदरत’ अशा अनेक चित्रपटांत दिसलेली अभिनेत्री वेरा सुंदर सिंग अर्थात अभिनेत्री प्रिया राजवंश ही बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळली होती. मार्च २००० मध्ये दिग्दर्शक चेतन आनंद यांच्या रूईया पार्क बंगल्याच्या बाथरूमममध्ये तिचा मृतदेह आढळला होता.
जिम मोरिसन
श्रीदेवी यांच्याआधी The Doors या रॉक बँडचा लीड सिंगर जिम मोरिसनचा मृत्यू बाथटबमध्ये झाला होता. केवळ वयाच्या २७ व्या वर्षी बाथटबमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने जिमचे निधन झाले होते. त्यादरम्यान जिम ड्रग्जच्या नशेत होता, असेही समोर आले होते. पॅरिसच्या एका अपार्टमेंटच्या बाथटबमध्ये तो मृतावस्थेत आढळला होता.
अल्बर्ट डेक्कर
अमेरिकन अभिनेता आणि राजकीय नेते अल्बर्ट डेक्कर आपल्या घराच्या बाथरूममध्ये नग्न अवस्थेत मृतावस्थेत आढळले होते.
क्लॉड फ्रेकॉईस
फ्रेंच पॉप गायक क्लॉड फ्रेक्रॉइस याचा वयाच्या ३९ व्या वर्षी बाथटममध्ये मृत्यू झाला. क्लॉड टबमध्ये उभा होत एक वाकलेला बल्ब ठीक करायला गेला आणि वीजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडला, असे म्हटले जाते.
एलविस प्रेसले
सन १९७७ मध्ये सुप्रसिद्ध सिंगर एलविस प्रेसले याचा मृत्यू बाथरूममध्ये झाला होता. बाथरूमच्या फरशीवर त्याचा मृतदेह आढळला होता. ड्रग्ससोबतच दहा औषधांच्या कॉकटेलमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते.
जुडी गारलँड
हॉलिवूड अभिनेत्री जुडी गारलँड हिचा मृत्यूही बाथरूममध्ये झाला होता. १९६९ मध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजनंतर ती बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळली होती.
विटनी ह्यूस्टन
सन २०१२ मध्ये सिंगर विटनी ह्युस्टन हिचा मृतदेह पाण्याने काठोकाठ भरलेल्या बाथटबमध्ये आढळला होता. ड्रग्जचा ओव्हरडोजमुळे विटनीचा मृत्यू झाल्याचे सांगितले गेले होते.
ALSO READ : श्रीदेवींची ‘ही’ जाहिरात ठरली अखेरची! वेगाने होतेय व्हायरल!!