एक कोटी रुपये मानधन घेणा-या पहिली महिला सुपरस्टार होत्या श्रीदेवी,दररोज खर्च करायच्या जवळपास २५ लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 17:04 IST
चित्रपटसृष्टीच्या चमचमत्या नभांगणातील चांदणी आणि सौंदर्याचे लेणं लाभलेल्या अभिनेत्री श्रीदेवी यांनी आपल्या अभिनयाने रसिकांवर मोहिनी घातली. याच अभिनयाच्या जोरावर ...
एक कोटी रुपये मानधन घेणा-या पहिली महिला सुपरस्टार होत्या श्रीदेवी,दररोज खर्च करायच्या जवळपास २५ लाख
चित्रपटसृष्टीच्या चमचमत्या नभांगणातील चांदणी आणि सौंदर्याचे लेणं लाभलेल्या अभिनेत्री श्रीदेवी यांनी आपल्या अभिनयाने रसिकांवर मोहिनी घातली. याच अभिनयाच्या जोरावर श्रीदेवी यांना हिंदी चित्रपटसृष्टीत मल्लिका-ए-हुस्न किंवा बॉलीवुडची पहिली महिला सुपरस्टार म्हणून संबोधलं जातं. हा तो काळ होता ज्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीत फक्त आणि फक्त अभिनेत्यांचाच बोलबाला होता. सिनेमातील नायिका म्हणजे केवळ नाचणारी, गाणारी आकर्षक बाहुली किंवा मग नायकाची प्रेमिका एवढंच समजलं जायचं.मात्र याच काळात श्रीदेवी यांनी आपलं श्रेष्ठत्व दाखवून दिले. आपला अभिनय, लोभस सौंदर्य, नृत्य, गंभीर भूमिका तितक्याच खुबीने साकारण्याची कला आणि कॉमेडीचं टायमिंग यामुळे श्रीदेवी यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःचं असं वेगळे स्थान निर्माण केले.रसिक श्रीदेवी यांच्यावर जीव ओवाळून टाकू लागले.श्रीदेवी नावाचं अदभुत रसायन हिंदी चित्रपटसृष्टीत जादू करु लागलं. त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केलंच, शिवाय त्यांच्यानंतर येणा-या अनेक नायिकांसाठी त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचे नाव कमावण्याची संधी उपलब्ध करुन दिली.हिंदीत जो काही महिलाप्रधान सिनेमांचा ट्रेंड पाहायला मिळतो त्याचे सगळे श्रेय श्रीदेवी यांनाच जातं. पुरुष सहकलाकारांपेक्षा त्या कोणत्याही बाबतीत मागे नव्हत्या. मग ते सिनेमा असो,त्यातील भूमिका असो किंवा मग त्या सिनेमांचं मानधन. हिंदी चित्रपटसृष्टीत नायकांपेक्षा जास्त मानधन स्वीकारणा-या मेजक्या अभिनेत्रींपैकी त्या एक होत्या. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यासाठी श्रीदेवी यांनी १ कोटी रुपये मानधन मागितलं होतं. ९०च्या दशकात नायिकेने मानधनासाठी अशाप्रकारे रोखठोक भूमिका घेणे कठीण होतं. मात्र अभिनेत्यांच्या तुलनेत श्रीदेवी यांनी स्वतःला कधीच कमी समजलं नाही.कोट्यवधीचे मानधन घेणा-या श्रीदेवी यांचा खर्चसुद्धा तितकाच होता. स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी त्या दिवसाला २५ लाख रुपये खर्च करायच्या असंही बोललं जातं.श्रीदेवी या सौंदर्याची खाण होत्या. हेच सौंदर्य टिकून रहावं यासाठी त्या खूप काळजी घ्याच्या. महागड्या ब्युटी पार्लरला जाणं, महागडी सौंदर्य प्रसाधनं वापरणं, महागडे कपडे, महागड्या साड्या, महागडे बूट असे राजेशाही शौक श्रीदेवी यांना होते. त्यासाठी त्या आपल्या कमाईतील लाखो रुपये दिवसाला खर्च करायच्या. इतकंच नाही तर त्यांचे हे महागडे शौक पूर्ण करण्यासाठी श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांना एकदा नोकरीही करावी लागली होती असंही बोललं जात असे. परदेशात फिरण्याचीही श्रीदेवी यांना हौस होती. मात्र परदेशात लग्न सोहळा आणि त्यानंतर फिरण्यासाठी गेले असताना श्रीदेवी यांचा मृत्यू व्हावा ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल.