दिव्याच्या मृत्यूनंतर लाडला या चित्रपटाचे काय करायचे हा प्रश्न चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांना पडला होता. लाडला या चित्रपटासाठी दिव्यानंतर श्रीदेवीचा विचार करण्यात आला आणि तिने देखील या चित्रपटात काम करण्यास लगेचच होकार दिला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता.
श्रीदेवी यांचे २४ फेब्रुवारीला निधन झाले तर दिव्या भारतीचा वाढदिवस २५ फेब्रुवारीला होती. दिव्याने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केल्यापासून तिची तुलना श्रीदेवी यांच्याशी केली जात होती. ती श्रीदेवी यांच्यासारखीच दिसते असे अनेकांचे म्हणणे होते. त्यामुळे दिव्या श्रीदेवी यांची लहान बहीण आहे का असा अनेकांना प्रश्न पडला होता.
अभिनेत्री श्रीदेवी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्या ५४ वर्षांच्या होत्या. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रूग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत व चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
Also Read : ही होती श्रीदेवी यांची अंतिम इच्छा