१९८३ मध्ये रिलीज झालेल्या ‘हिम्मतवाला’ या चित्रपटातूनच श्रीदेवीला हिंदी चित्रपटसृष्टीत ओळख मिळाली. असे म्हटले जाते की, चित्रपटाचे दिग्दर्शक के. राघवेंद्र राव यांना जितेंद्र यांनीच श्रीदेवीला चित्रपटात कास्ट करण्यास सांगितले होते. जेव्हा श्रीदेवीला जितेंद्रसोबत ‘हिम्मतवाला’ या चित्रपटासाठी कास्ट केले तेव्हा तिला खूपच आनंद झाला होता. कारण बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याअगोदरच श्रीदेवी जितेंद्र यांची जबरदस्त फॅन होती.
पुढे ‘हिम्मतवाला’ जबरदस्त हिट ठरली. शिवाय ही जोडी बॉलिवूडमध्ये हॉट केक बनली. याचकाळात दोघांच्या रोमान्सच्या चर्चाही समोर येवू लागल्या. श्रीदेवीने तर जितेंद्रबद्दल मनात असलेले प्रेमही व्यक्त केले होते. मात्र ही बाब जितेंद्र यांची पत्नी शोभा कपूर यांना समजली. शोभा यांना अगोदरच माहिती होते की, श्रीदेवीला जितेंद्र यांच्या सांगण्यानुसारच ‘हिम्मतवाला’मध्ये कास्ट करण्यात आले होते.
त्यामुळे शोभा यांचा तोल ढासळू लागला. पुढे जितेंद्र यांना त्यांच्यात प्रचंड तणाव निर्माण झाला. पत्नीचा गैरसमज दूर करण्यासाठी जितेंद्र यांनी चक्क श्रीदेवीला घरी बोलाविले. जितेंद्र यांची पत्नी शोभा आणि मुलगी एकता कपूर यांनीदेखील श्रीदेवीचे असे आदरातिथ्य केले जे श्रीदेवी अखेरपर्यंत विसरू शकली नसेल. मात्र यामुळे जितेंद्र आणि श्रीदेवीच्या नात्यात काहीसा दुरावा निर्माण झाला.
श्रीदेवीने स्वत: स्विकार केले होते की, बॉलिवूडमध्ये मिळालेल्या यशासाठी मी जितेंद्र यांची आभारी आहे. श्रीदेवीच्या मते, जितेंद्र तिचे ड्रीम स्टार होते. त्यांच्यासोबत तिचे एक वेगळेच नाते होते. परंतु स्टारडम मिळाल्यानंतर श्रीदेवी जितेंद्र यांच्यापासून दूर होत गेली.