Join us

​विराटसाठी अनुष्का ठेवणार ‘सुल्तान’ची स्पेशल स्क्रीनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 15:52 IST

लोक प्रेमात काय काय नाही करत? आता अनुष्काचेच उदाहरण घ्या ना! बॉयफ्रेंड विराटसाठी तिने आगामी ‘सुल्तान’ चित्रपटाचा स्पेशल शो ...

लोक प्रेमात काय काय नाही करत? आता अनुष्काचेच उदाहरण घ्या ना! बॉयफ्रेंड विराटसाठी तिने आगामी ‘सुल्तान’ चित्रपटाचा स्पेशल शो आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.या चित्रपटात अनुष्का पहलवानाच्या भूमिकेत असून त्यासाठी तिने जीवतोडून मेहनत घेतली आहे. सुरूवातीला केवळ विराटसोबत चित्रपट पाहण्याचा तिचा विचार होता.मात्र आता असे कळतेय, अनुष्का टीम इंडियामधील इतर क्रिकेटर्स व तिच्या मित्रमंडळींना देखील बोलावणार आहे. आता ‘यशराज’ बॅनर सहसा अशा प्रकारचे स्पेशल स्क्रीनिंग शो आयोजित करत नाही.तिने तिचा मित्र आणि निर्माता आदित्य चोपडाला विनंती केली आहे. परंतु अद्याप त्याला होकार आलेला नाही. पुढच्या महिन्याच्या सुरूवातीला विराट वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे तो जाण्याआधी त्याला चित्रपट दाखवावा अशी अनुष्काची इच्छा आहे.बघुया तिची इच्छा पूर्ण होते की नाही.