Join us

संजूबाबासाठी सल्लूमियाँचे स्पेशल गिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 22:46 IST

 सलमान खान आणि संजय दत्त यांची मैत्री २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘चल मेरे भाई’ चित्रपटापासूनच जास्त घट्ट झाली. केवळ ...

 सलमान खान आणि संजय दत्त यांची मैत्री २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘चल मेरे भाई’ चित्रपटापासूनच जास्त घट्ट झाली. केवळ सलमान खानच नव्हे तर संपूर्ण खान कुटुंबीय संजय दत्त कुटुंबियांच्या मदतीसाठी आणि पाठिंब्यासाठी उभे राहिले. काल संजय दत्त जेलमधून पाच वर्षांनंतर बाहेर पडला म्हणून सलमान खानने चक्क त्याच्यासाठी पनवेल फार्महाऊस येथे लॅव्हिश पार्टी आयोजित केली. या पार्टीत सर्व आप्तस्वकीय, मित्रपरिवार आमंत्रित होते. पार्टीचे होस्टिंग करून मग सलमान खान हरयाणाला ‘सुल्तान’ च्या शूटिंगला गेला. दबंग स्टार सलमानला ‘बजरंगी भाईजान’ च्या गाण्याच्या लाँचिगवेळी विचारण्यात आले की, संजय दत्त कधी येणार? तेव्हा सलमान म्हणाला की,‘ संजय दत्तला बाहेर यायला अद्याप वेळ आहे. तो जर आत्ताही बाहेर पडला. तर आम्ही नक्की पार्टी करू यात काही शंका नाही.’