Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘लव्ह लाईफ’बद्दल बोलली परी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2016 20:08 IST

परिणीती चोप्रा आणि दिग्दर्शक मनीष शर्मा यांच्या लिंकअपच्या बातम्या नव्या नाहीत. परी बॉलिवूडमध्ये आली तेव्हापासून या बातम्यांची चर्चा आहे. ...

परिणीती चोप्रा आणि दिग्दर्शक मनीष शर्मा यांच्या लिंकअपच्या बातम्या नव्या नाहीत. परी बॉलिवूडमध्ये आली तेव्हापासून या बातम्यांची चर्चा आहे. मनीष शर्माच्याच चित्रपटातून परीने बॉलिवूड डेब्यू केले. यानंतर मनीष शर्मा याच्या ‘शुद्ध देसी रोमान्स’मध्येही परी दिसली. त्यामुळे साहजिकच परी व मनीष यांच्यात चांगले व्यावसायिक नाते आहे. पण त्यापलीकडेही त्यांच्या नात्यात काही खास आहे. आमच्यात केवळ मैत्री आहे,असेच परी व मनीष दोघेही आजपर्यंत सांगत आलेत. पण बॉलिवूडमधील बहुतेकांचे म्हणणे ऐकाल, तर यांच्यात मैत्रीपेक्षा अधिक काही असल्याचेच ऐकायला मिळेल. एका मुलाखतीत परीला याबाबत विचारण्यात आले. याहीवेळी मनीष व मी केवळ चांगले मित्र असल्याचेच परीने सांगितले. मीडियाला कलाकारांच्या पर्सनल लाईफबद्दल लिहायचे असते आणि ते लिहितात. पण बºयाचदा यात काहीही तथ्य नसते. माझे खासगी आयुष्य माझे आहे. मी त्याबद्दल उत्तर देण्यास कुणालाही बांधिल नाही. पण तरिही माझ्या आयुष्यात कुणी स्पेशल असेल तर मी नक्की अगदी आनंदाने ही बातमी स्वत: जाहीर करेल. माझ्या मते, माझी लव्ह लाईफ फार बोरिंग आहे. कदाचित कुणालाच त्याबद्दल लिहायला आवडणार नाही, असेही परी म्हणाली.