Join us

Choked बद्दल बोलताना अनुराग कश्यप म्हणाला, सुरुवातीला मी नोटाबंदीमुळे खूपच खूष होतो पण ..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 18:24 IST

अनुराग कश्यप वेबसिरीज 'चोक्ड'मुळे चर्चेत आहे. वेबसिरीजमध्ये विविध मुद्दयांवर भाष्य करण्यात आले आहे.

काळा पैसा आणि बनावट नोटांचं रॅकेट यांविरुद्ध लढाईला बळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्या. या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसादही पाहायला मिळाले. हीच नोटबंदी आता पुन्हा एकदा घरबसल्या रसिकांना अनुभवता येणार आहे.

अनुराग कश्यप वेबसिरीज 'चोक्ड'मुळे चर्चेत आहे. वेबसिरीजमध्ये विविध मुद्दयांवर भाष्य करण्यात आले आहे. या वेबसिरीजमध्ये  'सरीता'च्या भूमिकेत सैयमी खेर झळकणार आहे. सरिताही बँकेत काम करणारी कर्माचारी दाखवण्यात आली आहे. संयमीसह मल्याळम अभिनेता रोशन मैथ्यूही महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.  'चोक्ड: पैसा बोलता है' वेबसिरीजचा ट्रेलर रसिकांच्याही पसंतीस पात्र ठरला होता. 

अनुराग कश्यप 'चोक्ड' विषयी म्हणाले की ही वेबसिरिजी नोटाबंदी यावर बेतलेला आहे किंवा नाही हे रसिकांनीच ठरवावे. मुळात ही कथा नोटबंदीपूर्वी लिहिली गेली होती. स्क्रिप्टचे पूर्ण काम झाल्यानंतर नोटबंदी  झाली होती. पण या कथेचा मुळ गाभा हा  सर्वसामान्य कुटुंबाची कथा हाच आहे.

अनुराग कश्यपने जेव्हा नोटबंदी देशात लागू झाली होती. तेव्हा याचे जाहीर स्वागतच केले होते. मात्र त्यानंतर नोटबंदी करणे हा योग्य निर्णय नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे घाईत घेतला गेलेला हा निर्णय होता असे मत अनुराग कश्यपने मांडले. 

माझे सर्व चित्रपट हे विविध गोष्टींना हात घालणारेच आहेत. पण जर 'चोक्ड' हा २०१५ मध्ये बनवला असता तर जाहजिकच नोटबंदीचा याच्याशी काही संंबंधच राहिला नसता. मात्र जेव्हा सिनेमा लिहीला गेला तेव्हाच नोटबंदी झाली हा निव्वळ योगायोग समजावा असे अनुराग कश्यपने सांगितले.

टॅग्स :अनुराग कश्यपसंयमी खेर