साउथच्या ‘या’ सुपरस्टारचा यु-ट्यूबवर धमाका; १० कोटींपेक्षा अधिक लोकांनी बघितला त्याचा जलवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 14:15 IST
साउथचा सुपरस्टार अलू अर्जुन याच्या एका चित्रपटाने यु-ट्यूबवर चांगलीच धूम उडवून दिली आहे. त्याचा हा चित्रपट आतापर्यंत १० कोटींपेक्षा अधिक लोकांनी बघितला आहे.
साउथच्या ‘या’ सुपरस्टारचा यु-ट्यूबवर धमाका; १० कोटींपेक्षा अधिक लोकांनी बघितला त्याचा जलवा!
यु-ट्यूबवर साउथ चित्रपटांचा प्रचंड प्रभाव जाणवतो. कारण या चित्रपटांना देशभरातील प्रेक्षक उदंड प्रतिसाद देत असल्यानेच बॉलिवूडमध्ये त्याचे रिमेक बनविण्याचा सध्या धडाका लावला आहे. बरेचसे साउथ चित्रपट आहेत, ज्यांनी यु-ट्यूबवर रेकॉर्ड केले आहे. आता यामध्ये स्टाउथ सुपरस्टार अलू अर्जुन याच्या एका चित्रपटाचा समावेश झाला आहे. होय, ‘दुवदा जगन्नाधम’ या तेलगू चित्रपटाला यु-ट्यूबवर आतापर्यंत १० कोटींपेक्षा अधिक ह्यु मिळाले आहेत. हा चित्रपट गेल्यावर्षी १९ नोव्हेंबरला यु-ट्यूबवर रिलीज केला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाचा हिंदी डब व्हर्जन आॅनलाइन रिलीज करण्याअगोदर चित्रपट टीव्हीवर रिलीज करण्यात आला होता. अशातही चित्रपट यु-ट्यूबवर बघितला जात असल्याने हे एक रेकॉर्ड मानले जात आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या चार दिवसांतच चित्रपटाला दोन कोटींपेक्षा अधिक ह्यु मिळाले. ‘दुवदा जगन्नाधम’ची कथा शैव ब्राह्मण पुजारी दुवदा जगन्नाधम याच्यावर आधारित आहे जो दुसºयांची मदत करीत असतो. त्याचा हा स्वभाव बघून एक पोलीस अधिकारी त्याला डीजे बनवितो. जो या नव्या भूमिकेतून गुन्हेगाºयांचा बीमोड करतो. ५० कोटी रुपये बजेट असलेला हा तेलगू चित्रपट २३ जून २०१७ रोजी रिलीज झाला होता. चित्रपटाने जवळपास ११५ कोटी रुपयांचा गल्ला जमविला होता. एकूणच बॉक्स आॅफिसवर चित्रपटाने धूम उडवून दिली होती. ‘दुवदा जगन्नाधम’मध्ये अलू अर्जुन व्यतिरिक्त पूजा हेगडे आणि मुरली शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाला हरिश शंकर यांनी दिग्दर्शित केले आहे.