Join us

केजीएफ फेम अभिनेता कृष्णा जी राव यांची अचानक प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 15:29 IST

केजीएफ फेम अभिनेता कृष्णा जी राव यांची अचानक प्रकृती खालावल्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.  

केजीएफ फेम अभिनेता कृष्णा जी राव यांची अचानक प्रकृती खालावल्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.  त्यांना बेंगळुरूच्या सीता सर्कलजवळील विनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेता एका नातेवाईकाच्या घरी जात होता यावेळी त्याला थकवा जाणवला, यानंतर लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर इन्सेंटिव्ह केअर युनिटमध्ये उपचार सुरू आहेत.

KGF मधील त्याचे काम त्याच्या करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरले आहे. KGF फ्रँचायझीमधील त्याची भूमिका सर्वांनाच आवडली आहे. 2018 मध्ये KGF: Chapter 1 च्या रिलीजनंतर, त्याने 30 चित्रपटांमध्ये काम केले आणि दुसऱ्या भागानंतर, त्याने सुमारे 15 चित्रपटांमध्ये काम केले. 

KGF Chapter 2 ला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यातील प्रत्येक पात्राचे कौतुक झाले आहे. यशच्या अभिनयापासून ते संवाद आणि अॅक्शन सीक्वेन्सपर्यंत या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. याने अनेक बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडले आणि कन्नड चित्रपट उद्योगासाठी एक नवीन बेंचमार्क सेट केला. 'KGF: Chapter 2' कन्नड, हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळममध्ये रिलीज झाला. हा चित्रपट सध्या अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारित होत आहे. 

टॅग्स :हॉस्पिटल