Join us  

​ बुर्ज खलिफासमोर अशी बेधूंद नाचली सुश्मिता सेन! पाहा व्हिडिओ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2018 5:38 AM

सुश्मिता सेन म्हणजे बॉलिवूडची ‘जिंदादिल’ अभिनेत्री. सध्या सुश्मिता दुबईत हॉली डे एन्जॉय करतेय. दुबईत तिची धम्माल मस्ती सुरु आहे. या धम्माल मस्तीचे काही व्हिडिओ सुश्मिताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सुश्मिता सेन म्हणजे बॉलिवूडची ‘जिंदादिल’ अभिनेत्री. सध्या सुश्मिता दुबईत हॉली डे एन्जॉय करतेय. दुबईत तिची धम्माल मस्ती सुरु आहे. या धम्माल  मस्तीचे काही व्हिडिओ सुश्मिताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातील एक व्हिडिओ पाहून  तुमचीही पावलं थिरकायला लागतील, असा हा व्हिडिओ आहे . विशेष म्हणजे, हा व्हिडिओ दुबईतील जगप्रसिद्ध बुर्ज खलिफासमोर शूट केला गेला आहे.  बुर्ज खलिफासमोर सुश्मिताला बेधूंद नाचताना पाहून तुमचेही मन नाचायला लागेल, हे आम्ही दाव्यानिशी सांगू शकतो. हा व्हिडिओ शेअर करताना सुश्मिताने एक सुंदर कॅप्शन दिले आहे.Who knows the secrets tomorrow will hold, we don't really need to know"  TRUE THAT!!!! After all 'Tomorrow' will simply be more of today Making TODAY count is LIFE...a beautifully fulfilling one!!!!To all of you who have constantly added love & inspiration to my life...I dance with you in gratitude!, असे तिने लिहिले आहे. व्हिडिओत तिच्यासोबत तिचे काही मित्रही डान्स करताना दिसत आहेत. सुश्मिताचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा पाहा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कळवा.ALSO READ : कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत सुश्मिता सेनने लावले ठुमके, पाहा व्हिडीओ !सुश्मिताला मोठ्या पडद्यावर पाहण्यास चाहते उत्सूक आहे. पण तूर्तास तरी तिने कुठलाही चित्रपट साईन केलेला नाही. इंडस्ट्रीत नवखी असताना सुश्मिता व विक्रम भट्ट या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा  रंगल्या होत्या. सुश्मितासाठी विक्रमने आपल्या पत्नी व मुलीलाही सोडले होते. पण इतके करूनही सुश्मिता विक्रमच्या आयुष्यात टिकली नाही. पुढे विक्रमने या रिलेशनशिपबद्दल पश्चातापही व्यक्त केला होता. विक्रमनंतर सुश्मिताच्या आयुष्यात रणदीप हुड्डाची एन्ट्री झाली. सुश्मिताची दत्तक मुलगी रेनी हिलाही रणदीप आवडायचा. पण काही वर्षांत या रिलेशनशिपचाही शेवट झाला. रणदीपनंतर अगदी अलीकडे सुश्मिता मनिष मल्होत्राच्या पार्टीत एका तिच्यापेक्षा कमी वयाच्या तरूणासोबत दिसली होती. सुश्मिता या तरूणाच्या खूप क्लोज आहे, अशी चर्चा आहे.