Join us  

आला रे आला सूर्यवंशी आला...! अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’चा फर्स्ट लूक रिलीज!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 10:40 AM

अक्षय कुमारच्या एका आगामी चित्रपटाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. हा चित्रपट कोणता तर ‘सूर्यवंशी’. होय, रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय एका एसटीएस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे

ठळक मुद्देपुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर रोहित व अक्षयचा ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित होणार आहे.

अक्षय कुमारच्या एका आगामी चित्रपटाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. हा चित्रपट कोणता तर ‘सूर्यवंशी’. होय, रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय एका एसटीएस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. रोहित पहिल्यांदा अक्षयसोबत काम करतोय. रोहितने आपल्या ‘सिम्बा’ या चित्रपटात ‘सूर्यवंशी’ची एक झलक दाखवली होती. ही झलक पाहिल्यानंतर ‘सूर्यवंशी’चे फर्स्ट लूक पाहण्यास चाहते उत्सूक होते. तर आता ती प्रतीक्षाही संपलीय. होय, रोहित व अक्षयच्या ‘सूर्यवंशी’चे फर्स्ट लूक प्रदर्शित झालेय. काही तासांपूर्वी ट्रेड एक्स्पर्ट गिरीश जौहर यांनी या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला. साहजिकचं हा फर्स्ट लूक पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली नसेल तर नवल...

या अ‍ॅक्शन चित्रपटात अक्षय एटीएस आॅफिसरची भूमिका साकारतोय. चित्रपटात अक्षयचे नाव सूर्यवंशी असेल. दहशतवादाविरोधात तो लढताना दिसेल. चित्रपटात अक्षयच्या अपोझिट कोण हिरोईन दिसणार, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. अक्षयने या चित्रपटासाठी पूजा हेगडेचे नाव सुचवले असल्याची बातमी मध्यंतरी होती. अर्थात अद्याप याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही.पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर रोहित व अक्षयचा ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित होणार आहे. ‘सिम्बा’प्रमाणेच रोहित शेट्टीचा हा आगामी चित्रपटही एका साऊथच्या सिनेमाचा रिमेक असल्याचे मानले गेले होते. तामिळ भाषेतील ‘सूर्यवंशी’याचाच हा हिंदी रिमेक असल्याची चर्चा  होती. ही बातमी आली आणि अनेकांचा चटकन विश्वास बसला. कारण रोहितने याआधीही अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेक बनवले आहेत. पण ही बातमी ऐकताच रोहित प्रचंड संतापला होता. ‘सूर्यवंशी’ कुठल्याही चित्रपटात रिमेक नाही. ही एक ओरिजनल स्टोरी आहे. दीर्घकाळापासून यावर काम सुरु होते, असे त्याने यानंतर स्पष्ट केले होते. तुम्हाला ठाऊक असेलच की, केवळ साऊथमध्येच नाही तर हिंदीतही ‘सूर्यवंशी’नावाचा चित्रपट याआधी बनला आहे. या जुन्या ‘सूर्यवंशी’मध्ये सलमान खान लीड रोलमध्ये होता. 

टॅग्स :सूर्यवंशीरोहित शेट्टीअक्षय कुमार