Join us

सोनू सूदच्या मुलाचा फोटो पाहिला का? त्याच्या इतकाच आहे तो देखील फिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 13:05 IST

सोनूने नुकताच मुलासोबत व्यायाम करतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

ठळक मुद्देअभिनेता सोनू सूद सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्याने इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तो घरात व्यायाम करताना दिसत असून त्याच्यासोबत आपल्याला त्याचा मुलगा देखील दिसत आहे.

कोरोना व्हायरसने देशात थैमान घातले असल्यामुळे सध्या देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या घरात राहून आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. बॉलिवूड सेलिब्रेटी सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांना ते सध्या घरात बसून काय करत आहेत याविषयी माहिती देत आहेत.

अभिनेता सोनू सूद सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्याने इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तो घरात व्यायाम करताना दिसत असून त्याच्यासोबत आपल्याला त्याचा मुलगा देखील दिसत आहे. सोनू या फोटोत प्रचंड फिट दिसत असून त्याचा मुलगा देखील त्याच्यासारखाच फिट आहे असे हा फोटो पाहून आपल्याला म्हणावे लागले.

बॉलिवूडमधील फिट अभिनेत्यांमध्ये सोनू सूदचा समावेश होता. त्याच्या फिटनेसची नेहमीच चर्चा रंगते. तो नियमितपणे व्यायाम करतो. तसेच तो पूर्णपणे शाकाहारी असून त्याच्या आहारात तो जास्तीत जास्त फळं आणि भाज्या यांचा समावेश करतो.

सोनू सूदने इन्स्टाग्रामला शेअर केलेला फोटो त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. जैसा बाप... वैसा बेटा असे लोक कमेंटद्वारे सांगत आहेत. केवळ साममान्य लोकांनीच नव्हे तर सेलिब्रेटींनी देखील या फोटोवर कमेंट केले आहे. रिधिमा पंडितने कमेंट केले आहे की, इशानचा फोटो पाहून मला आता मी म्हातारी झाल्यासारखी वाटायला लागले आहे तर प्यार का पंचनामा २ फेम ओंकार कपूरने हा फोटो त्याला खूप आवडला असल्याचे कमेंटद्वारे सांगितले आहे.

1999 मध्ये सोनूने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. तामिळ चित्रपट ‘कल्लाजहगर’ मधून त्याने अ‍ॅक्टिंग डेब्यू केला. 2002 मध्ये त्याचा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘शहीद-ए-आजम’ रिलीज झाला. परंतु त्याला खरी ओळख मिळाली ती ‘युवा’मधून. यानंतर कहां हो तुम, शीशा, आशिक बनाया आपने, जोधा अकबर, एक विवाह ऐसा भी, दबंग, बुड्ढा होगा तेरा बाप, मैक्सिमम, रमैया वस्तावैया, आर...राजकुमार आणि हैप्पी न्यू ईयर यासारख्या चित्रपटांत झळकला. आता तो अक्षय कुमारच्या पृथ्वीराज या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :सोनू सूद