Join us  

Sonu Nigam : कॉन्सर्टमध्ये झालेल्या धक्काबुक्कीनंतर सोनू निगम विमानतळावर दाखल, हसत हसत म्हणाला, 'ऑल ओके..'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 12:12 PM

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमसोबत धक्काबुक्की झाल्याची घटना काल संध्याकाळी घडली.

Sonu Nigam : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमसोबत धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. काल संध्याकाळी मुंबईतील चेंबूर परिसरात ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्यावतीने आयोजित फेस्टिवलमध्ये सोनू निगम उपस्थित होता. त्यावेळी सेल्फी घेण्याच्या वादातून आमदाराच्या मुलाची सोनू निगम आणि त्याच्या टीमसोबत झटापट झाली. सोनू परफॉर्म करत असताना स्थानिक आमदारानं सोनूची टीम मॅनेजर सायरासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. सोनूच्या सुरक्षारक्षकांवर हल्ला करण्यात आल्याने त्यांना दुखापत झाली आहे. सोनूने मध्यरात्री चेंबूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर आज सकाळीच सोनू विमानतळावर स्पॉट झाला. 

कालच्या प्रकारानंतर आज सकाळी गायक सोनू निगमला विमानतळावर पाहिले गेले. यावेळी फोटोग्राफर्सने त्याची विचारपूस केली. तेव्हा सोनू हसतच पापाराझींना 'ऑल ओके'असं म्हणाला. सोनू सुखरुप असून त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. 

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा सोनू निगमसोबत स्टेजवर झटापट सुरू होती. तेव्हा त्याच्या अंगरक्षकाने सोडवण्याचा प्रयत्न केला. सोनू निगमला ढकलले असता अंगरक्षक मध्ये आला तेव्हा त्यालाही धक्का दिल्याने तो पायऱ्यांवरून खाली पडला. दरम्यान, या व्यक्तीने पुन्हा सोनूला कॉलरने पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचा सहकारी गायक रब्बानी खान याने सोनूला वाचवण्यासाठी मध्यस्थी केली. त्यानंतर त्या हल्लेखोराने रब्बानी खान यांनाही जोरात ढकलले आणि तोदेखील पायऱ्यांवरून ७ फूट खाली जमिनीवर पडला. सुदैवाने, या झटापटीत सोनू निगमला दुखापत झाली नाही, परंतु त्याचा अंगरक्षक आणि गायक मित्र रब्बानी खान जखमी झाले.

टॅग्स :सोनू निगमगुन्हेगारीमुंबई