ड्रायव्हर सलीमच्या बहादुरीवर सोनू निगम फिदा; पाच लाखांचे बक्षीस केले जाहीर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2017 14:10 IST
अमरनाथ यात्रेदरम्यान भाविकांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जीवाची बाजी लावत भाविकांचे प्राण वाचविणाºया ड्रायव्हर सलीमच्या धाडसावर गायक सोनू निगम ...
ड्रायव्हर सलीमच्या बहादुरीवर सोनू निगम फिदा; पाच लाखांचे बक्षीस केले जाहीर!
अमरनाथ यात्रेदरम्यान भाविकांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जीवाची बाजी लावत भाविकांचे प्राण वाचविणाºया ड्रायव्हर सलीमच्या धाडसावर गायक सोनू निगम फिदा झाला आहे. सलीमने प्रसंगावधान राखत ४९ भाविकांचा जीव वाचविला होता. सलीमच्या या धाडसाचे देशभरात कौतुक केले जात आहे. मात्र सोनूला सलीमचा हा धाडसीपणा खूपच भावला असून, त्याला पाच लाख रुपये बक्षीस देणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे. इंग्रजी वृत्तपत्र मुंबई मिररशी बोलताना सोनूने म्हटले की, ‘सलीमसारख्या लोकांना सरकारकडून नेहमीच त्यांच्या धाडसासाठी शाबासकी मिळत असते. परंतु माझ्या मते अशा लोकांना आर्थिक मदत घोषित करायला हवी.’ काही दिवसांपूर्वी अजान लाउडस्पीकर प्रकरणामुळे सोनू वादात सापडला होता. त्यावेळी त्याने ट्विटरच्या माध्यमातून अजानच्या लाउडस्पीकरविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मुस्लीम समुदायाकडून त्याच्यावर टीका करण्यात आली होती. हा वाद एवढा पेटला होता की, सोनूला स्वत:चे मुंडण करावे लागले होते. असा केला होता भ्याड हल्लाअमरनाथहून परतणाºया भाविकांच्या बसवर १० जुलै रोजी सायंकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये सात भाविकांचा मृत्यू, तर १९ भाविक जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी फायरिंग केली होती, जेव्हा बस अमरनाथ यात्रेवरून परतत होती. यामध्ये अनेक भाविकांचे प्राण जाण्याची शक्यता होती. परंतु ड्रायव्हर सलीमने प्रसंगावधान दाखवित ४९ भाविकांना सुखरूप सुरक्षितस्थळी पोहोचविले. जेव्हा बसवर दहशतवादी बेछुट गोळ्या झाडत होते, तेव्हा सलीमने न थांबता बस जोरात पळविली. जर सलीमने बस थांबविली असती तर कदाचित घटना यापेक्षाही अधिक गंभीर असती. सलीमने जोरात बस पळवित मिलिटरी कॅम्प गाठले. सलीमच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले गेले. सरकारकडूनही सलीमला बक्षीस जाहीर झाले आहे.