Join us

स्वराच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर सोनमने केले लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 22:54 IST

‘निल बाटे सन्नाटा’ या स्वरा भास्करच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर सोनम कपूरने सोशल मीडियावर लाँच केले आहे. सोनम कपूर आणि ...

‘निल बाटे सन्नाटा’ या स्वरा भास्करच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर सोनम कपूरने सोशल मीडियावर लाँच केले आहे. सोनम कपूर आणि स्वरा भास्कर या दोघी चांगल्या मैत्रीणी आहेत. ‘भूतनाथ रिटर्न्स’ दिग्दर्शक नितेश तिवारी यांची पत्नी आश्विनी अय्यर तिवारी ही दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवत असून ती ‘निल बाटें सन्नाटा’ या चित्रपटापासून करिअरची सुरूवात करत आहे. ही एका आई आणि मुलीच्या आयुष्यावरील कथा आहे. या चित्रपटातील अभिनयासाठी स्वराला बेस्ट अ‍ॅक्ट्रेस अ‍ॅवॉर्ड मिळाला आहे. पोस्टरमध्ये स्वरा आणि तिची किशोरवयीन मुलगी आनंदाने उड्या मारत आहेत. सोनम म्हणाली,‘ आॅन वुमन्स डे, आय हॅव्ह द प्रिव्हिलेज आॅफ लाँचिंग माय बहन स्वरा पोस्टर!’ ‘नीरजा’ स्टार आणि स्वरा दोघींनी आनंद एल राय यांच्या ‘रांझणा’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. तसेच प्रेम रतन धन पायो मध्येही त्या दोघी एकत्र दिसल्या आहेत. ‘निल बाटें सन्नाटा’ हा चित्रपट तमीळमध्ये रिलीज होणार आहे.