बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयानं लोकांना आश्चर्यचकित केले आणि नंतर त्या इंडस्ट्रीमधून गायब झाल्या. आज आम्ही तुम्हाला अशाच अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिनं पहिल्याच चित्रपटातून मोठी प्रसिद्धी मिळवली. पण, यशाच्या शिखरावर असताना बॉलिवूडला अलविदा केलं.
ती अभिनेत्री आहे सोनम खान. सोनम खानला 'हॉट ब्युटी' म्हटलं जायचं. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश करत आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने तिनं सर्वांचे मन जिंकलं होतं. १९८७ मध्ये आलेल्या 'सम्राट' या तेलुगू चित्रपटातून तिनं अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. यानंतर 'विजय' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर तिनं कधीही मागे वळून पाहिलं नाही.
सोनमच्या 'विजय' सिनेमातील बिकिनी अवताराने खळबळ उडवून दिली होती. लहान कपडे घालून कॅमेऱ्यासमोर हॉट किसिंग सीन्स देण्यास ती मागेपुढे पाहत नव्हती. सनी देओल आणि नसीरुद्दीन शाह यांच्या 'त्रिदेव' चित्रपटातील 'ओये ओये' या गाण्यासाठी ती ओळखली जाते. तिने ऋषी कपूरसोबत एक लिपलॉक सीनही दिला होता. त्यानंतर सोनम खानने 'मिट्टी और सोना' चित्रपटात १ मिनिटाचा न्यूड सीन देऊन सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.
सोनम खानला अभिनेत्री म्हणून खूप यश मिळालं. पण, वयाच्या २० व्या वर्षी गर्भवती राहिल्यामुळे तिनं बॉलिवूड सोडलं आणि पतीसोबत परदेशात स्थलांतरित झाली. सोनमचे त्रिदेवचे दिग्दर्शक राजीव राय यांच्याशी प्रेमसंबंध होते आणि नंतर दोघांनी लग्न केलं. दोघांनाही एक मुलगा आहे. तथापि, लग्नाच्या काही वर्षांनी या जोडप्याचा घटस्फोट झाला. आता सोनम खान मुंबईत परतली आहे आणि जिओ वर्ल्ड प्लाझा कार्यक्रमात ती स्पॉट झाली होती. ती पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार का हे लवकरच स्पष्ट होईल.