Join us  

सोनम कपूरची छोटी बहिण गेल्या १० वर्षांपासून या व्यक्तीसोबत आहे रिलेशनशीपमध्ये, पहा त्यांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 12:28 PM

सोनमसारखी तिची छोटी बहिण अभिनय क्षेत्रात नसल्यामुळे ती लाइमलाइटपासून दूर असते.

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची छोटी मुलगी आणि सोनम कपूरची बहिण रिया कपूर बॉलिवूड इंडस्ट्रीत निर्माती म्हणून सक्रीय आहे. रिया गेल्या १० वर्षांपासून एका व्यक्तीला डेट करत आहे. त्या व्यक्तीचं नाव करण बुलानी असून तो सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे.

रियाचा बॉयफ्रेंड करण चित्रपट दिग्दर्शक आहे. त्याने 'आयशा' व 'वेकअप सिड' यासारख्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे, करणने कित्येक चित्रपट व शोजचे दिग्दर्शन, प्रोडक्शन व डबिंगचे काम केले आहे.

२०१३ साली वृत्त आले होते की रिया आणि करणचे लग्न सोनम कपूरच्या आधी होणार आहे. करणची फॅमिली यानिमित्ताने कपूर फॅमिलीला भेटण्यासाठी दिल्लीतून मुंबईत आले होते आणि असे वृत्त आले की डिसेंबर २०१३ साली त्यांचे लग्न फिक्स झाले आहे. मात्र काही कारणांमुळे ते झालं नाही.सोनम कपूरच्या लग्नाच्यावेळी करण व रियाने त्यांच्या नात्याची कबूली दिली होती.

कपूर फॅमिली अनिल कपूर यांचा ६०वा वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडनला गेले होते. त्यावेळी आनंद आहूजा सोबत रियाचा बॉयफ्रेंड करणदेखील होता. कपूर फॅमिलीच्या सेलिब्रेशन फोटोंमध्ये हे कपल पहायला मिळाले होते

रियाने २०१० साली मोठी बहिण सोनम कपूर व अभय देओलचा चित्रपट 'आयशा'ची निर्मिती केली होती. याशिवाय तिने सोनम अभिनीत 'खुबसूरत' आणि 'वीरे दी वेडिंग'चीही निर्मिती केली आहे.

रिया निर्मातीसोबत एक फॅशन डिझायनरदेखील आहे. सोनम कपूरचे ड्रेस ती स्वतःच डिझाईन करते. तिचा फॅशन ब्रॅण्ड आहे रेहसन (Rheson).

रिया सोनमसारखी अभिनय क्षेत्रात नसल्यामुळे ती लाइमलाइटपासून दूर असते.

 

टॅग्स :सोनम कपूरअनिल कपूर