Join us

​सोनम कपूरच्या लग्नात स्टायलिश अंदाजात अवतरला छोटा नवाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 13:12 IST

सोनम कपूरच्या लग्नात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली अशून सोनमच्या लग्नाच्या विधी आता सुरू झाल्या आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ ...

सोनम कपूरच्या लग्नात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली अशून सोनमच्या लग्नाच्या विधी आता सुरू झाल्या आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, दिग्दर्शक करण जोहर हे कपूर कुटुंबियांशी अगदी जवळचे संबंध असल्याने सकाळपासूनच ही मंडळी सोनमच्या लग्नाला पोहोचली आहेत. नुकतेच सोनमच्या लग्नात वीर दे वेडिंग या चित्रपटातील तिची सहकलाकार करिना कपूरचे आमनन झाले आहे. करिना पती सैफ अली खान आणि बहीण करिश्मा कपूरसोबत आली असून तिचा छोटासा तैमुर देखील लग्नाला आला आहे. तैमुर अगदी नवाबासारखा दिसत असून त्याच्या केसाची छानशी पोनी देखील बांधली आहे. तैमूरने आपल्या वडिलांसारखाच सदरा आणि सुरवार घातली आहे तर करिना पिंक रंगाच्या लेहंगामध्ये खूपच छान दिसत आहे. सोनम आणि आनंद आहुजा गेली अनेक वर्षं एकमेकांना डेट करत आहेत. मुंबईत ते आज लग्नबंधनात अडकत असून त्यांची संगीत आणि मेहेंदी सेरमनी देखील गाजावातात झाली. रविवारी संध्याकाळी सोनमच्या हळदीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला होता. मेहंदी सेरेमनीमध्ये तर ती ठुमके लावताना दिसली. नवऱ्यासोबत तिने 'लत लग गई' या गाण्यावर अफलातून डान्स केला. तसेच सेरेमनीमध्ये सोनमच्या कुटुंबातील अनेक मंडळी नृत्य करताना दिसली. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूर, रेहा कपूर, अंशुला कपूर सोनमच्या संगीत सेरेमनीत डान्स परफॉर्म करण्यासाठी तयारीला लागले होते. या सगळ्यांनीच आपल्या लाडक्या बहिणीच्या संगीत सेरेमनीत डान्स केला तर अनिल कपूर लाडक्या लेकीच्या संगीत सेरेमनीमध्ये नृत्य करताना दिसले. सोनमची वेडिंग सेरेमनी तिची जवळची नातेवाईक आणि इंटेरियर डिझायनर कविता सिंग यांच्या बॅण्डस्टॅण्डस्थित आलिशान बंगल्यात पार पडत आहे. लग्नाचे सर्व विधी घरातच असलेल्या मंदिरात केले जात आहेत. आनंद अहुजा हा दिल्लीचा असल्यामुळे मुंबईनंतर दिल्लीतदेखील सेलिब्रेशन होणार आहे. दिल्लीत जंगी रिसेप्शन दिले जाणार आहे.   आनंद आणि सोनमच्या अफेअरची चर्चा 2016पासून आहे. मात्र सोनम आणि आनंदने कधीही त्यांच्यातील रिलेशनशिपविषयी जाहिरपणे सांगितले नाही. दोघीनीही नाते प्रायव्हेट ठेवले होते. मात्र त्यांच्यातल्या केमिस्ट्रीमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले. आनंद देशातील सर्वात मोठ्या एक्सपोर्ट हाउस म्हणजे शाही एक्सपोर्टचे मालक हरिष आहुजाचा यांचा मुलगा आहे. आनंद या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आहे. हा त्याचा फॅमिली बिझनेस आहे.Also Read : या कारणामुळे सोनम कपूरची आजी लावणार नाही लग्नाला हजेरी