सोनम कपूरचे झाले होते लौंगिक शोषण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 12:18 IST
हॉलीवूडमध्ये ‘लास्ट टँगो इन पॅरिस’ आणि बॉलीवूडमध्ये रेखावर जबदस्तीने शूट करण्यात आलेल्या किसिंग सीनची जोरदार चर्चा सुरू असताना आणखी ...
सोनम कपूरचे झाले होते लौंगिक शोषण?
हॉलीवूडमध्ये ‘लास्ट टँगो इन पॅरिस’ आणि बॉलीवूडमध्ये रेखावर जबदस्तीने शूट करण्यात आलेल्या किसिंग सीनची जोरदार चर्चा सुरू असताना आणखी एका अभिनेत्रीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराविषयी खुलासा केला आहे.बॉलीवूडची ‘मसकली गर्ल’ सोनम कपूरवर लैंगिक अत्याचार झाला होता. सामाजिक आयुष्यात महिलांवर होणारे अत्याचार, शोषणसंदभार्तील प्रश्नावर चर्चा करत असताना खासगी आयुष्यात तिच्यासोबत घडलेली एक गोष्टही तिने जगासमोर मांडली. ‘जेव्हा मी लहान होते तेव्हा माझाही विनयभंग झाला होता, याचा माझ्यावर खूप खोलवर परिणाम झाला', असा खुलासा तिने केला.अनिल कपूर यांची मुलगी सोनमच्या या खुलाशाने इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सुखवस्तू कुटुंबातील मुलीदेखील सुरक्षित नसल्याचे यातून दिसून येते, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉलीवूड, क्रीडा आणि राजकारणासहीत अनेक क्षेत्रांमध्ये महिला एकीकडे स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करत आहेत, तर दुसरीकडे आजही समाजात अनेक महिला शारीरिक आणि मानसिक शोषणाचे बळी जात आहेत. सोनमच्या आधीही अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी स्वत:सोबत झालेल्या शारीरिक आणि मानसिक शोषणाचा खुलासा केला आहे. 'पार्च्ड' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान राधिका आपटे आणि सुरवीन चावलाने स्वत: सोबत झालेली छेडछाड, कास्टिंग काऊच आणि शोषण याबाबत जाहीर वक्तव्य केले होते. पार्च्ड अभिनेत्री : राधिका आपटेचित्रपटात काम देण्याच्या अमिषाने नवोदित कलाकारांचे लैंगिक शोषण करण्याची प्रथा बॉलीवूडमध्ये फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचा हा काळा चेहरा ‘एव्हरग्रीन’ अभिनेत्री रेखा यांनीसुद्धा उघड केला आहे. करिअरच्या सुरुवातीला आपल्याला दिग्दर्शक आणि अभिनेत्याच्या ‘जबदरस्ती’ला सामोरे जावे लागले होते, असा खळबळजनक खुलासा त्यांच्या जीवनावर आधारित ‘रेखा - अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकामध्ये करण्यात आला. 1969 साली आलेल्या ‘अंजाना सफर’ या चित्रपटात त्यांच्या इच्छेविरुद्ध पाच मिनिटापर्यंत किसिंग सिन चित्रित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांचे वय होते 15 वर्ष. शूटींगपूर्वी त्यांना याची पुसटशी कल्पनादेखील नव्हती. दिग्दर्शकाने अॅक्शन म्हटल्यावर मुख्य अभिनेता बिस्वजीतने रेखाला आपल्या मिठीत घेतले आणि आपले ओठ रेखाच्या ओठांवर टेकवले. दिग्दर्शकाने ‘कट’ म्हटल्यावरही त्याने रेखाला सोडले नाही. जवळ जवळ ५ मिनिटे विश्वजितने रेखाला त्यांना मिठीत ठेवलं होते. या प्रसंगामुळे मी कायमची धस्तावले, असे त्या म्हणाल्या. पिंक अभिनेत्री : तापसी पन्नू'पिंक' फेम अभिनेत्री तापसी पन्नूनेही सांगितले की, 'छेडछाडीविरोधातील महिलावगार्ची रोजची लढाई आहे. माझ्यासोबत विनयभंग होण्यासारखा प्रकार घडला नाही. मात्र प्रवासादरम्यान येता-जाता शारीरिक छेडछाडी झाली आहे. लोक स्वत: अंगावर येऊन पडायचे. त्यावेळी एवढी हिंमत असती की दगड उचलू शकले असते किंवा स्वत: याविरोधात आवाज उठवला असता, असा विचार आज मी करते'.cnxoldfiles/a> असे या चित्रपटाचे दिग्दर्शक बर्नार्डो बेतोर्लुची यांनी सांगितल्याने पुन्हा एकदा वादात अडकला आहे. हा सीन वास्तववादी असावा यासाठी मी अभिनेत्रीला याबद्दलची माहिती दिली नव्हती असेही त्यानी सांगितले.