या वेडिंग स्पेशल फॅशन शोमध्ये साराने स्वत:ला असे काही कॅरी केले होते की, प्रत्येकाच्या नजरा तिच्याकडे वळल्या. सारा आई अमृता सिंहसोबत याठिकाणी आली होती. तिचे या इव्हेंटमधील फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ते कसे वाटलेत, हे आम्हाला नक्की कळवा. शिवाय साराबद्दल तुम्हाला काय वाटते, तेही सांगा. तुमची मते तुम्ही खालील कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता.
सारा बॉलिवूडमध्ये अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘केदारनाथ’ चित्रपटातून डेब्यू करण्यास सज्ज आहे. यात सारा सुशांत सिंग राजपूतसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.
मध्यंतरी सारा करण जोहरच्या ‘स्टुडेंट आॅफ इअर 2’ मधून डेब्यू करणार असल्याची खबर होती. मात्र ही बातमी केवळ अफवा ठरली. बॉलिवूडमध्ये डेब्यूच्या आधीच सारा स्टार बनली आहे. नुकत्याच न्यूयॉर्कमध्ये झालेल्या 18 व्या आयफा पुरस्कार सोहळ्यात सुद्धा साराने हजेरी लावली होती.