Join us

सोनम कपूर जेव्हा भावूक होते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 15:14 IST

अभिनेत्री सोनम कपूर ही स्वरा भास्करचा ‘नील बत्ते सन्नाटा’ चित्रपट पाहून भावूक झाली. हा अत्यंत सुंदर चित्रपट आहे. स्वरा ...

अभिनेत्री सोनम कपूर ही स्वरा भास्करचा ‘नील बत्ते सन्नाटा’ चित्रपट पाहून भावूक झाली. हा अत्यंत सुंदर चित्रपट आहे. स्वरा भास्करने खूप छान काम केले आहे. सध्याची ती सर्वात उत्कृष्ट अभिनेत्री आहे. असे चित्रपट वारंवार व्हायला हवे आहेत. येत्या काळात असे चित्रपट येतील, अशी अपेक्षा आहे. बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट चांगली कामगिरी करतोय, याचा मला आनंद आहे,’ असे सोनम कपूरने सांगितले. ज्येष्ठ लेखक सलीम खान आणि त्यांच्या पत्नी हेलन देखील या स्क्रीनिंगच्या वेळी उपस्थित होते.सोनम आणि स्वरा या दोघी चांगल्या मैत्रीणी आहेत. सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले होते. येत्या काळातही या दोघी एकत्र काम करतील असे बोलले जाते. यावर स्वराने इतक्यात बोलणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.दिग्दर्शक अश्विनी अय्यर तिवारी विषयी सोनम म्हणाली, तुम्हाला हा तिचा पहिला चित्रपट आहे, असे वाटणार नाही. मी देखील तिला विचारणार आहे. तिने कलाकारांकडून  चांगल्या पद्धतीने काम करुन घेतले आहे. मी तिच्या कामावर खूपच इम्प्रेस झाले आहे, असे सोनम म्हणाली.