Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : सोनम कपूरचा व्हिडीओ बघून यूर्जस म्हणाले- आपका विग लटक रहा है बहन

By गीतांजली | Updated: November 2, 2020 18:30 IST

सोशल मीडियावर अभिनेत्री सोनम कपूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावर अभिनेत्री सोनम कपूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोनम इन्स्टाग्रामवर बरीच सक्रिय असते. आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळे ती चर्चेत येत असते. सोनम कपूर अशाच एका तिच्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. ज्यात सोनम मेकअप करताना दिसतेय. सोनम या व्हिडीओत मर्लिन मुनरोवाला लूक करताना दिसतेय. 

 सोनम कपूरने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले, 'माझा मुनरो मोमेंट' पाहा सोनम कपूर अहूजा कशी मर्लिन मुनरो झाली. मूर्ख बनविण्यात वेळ वाया घालवू नका. मला येथे तासंतास बसावे लागले आणि माझ्या टीमने ही जादू केली.' सोनमने सांगितले की ती रिझल्ट खूप खूश आहे.

यावर यूजर्सनी खूप सारे कमेंट्स केले आहे. कुणी लिहिले, शानदार फेस पेंटिंग, तर कुणी लिहिले, तुझा विग हलतो आहे. याला फिक्सकर नाहीतर तो पडले बहिणी. कुणी लिहिले, तर आहे तुझ्या सौंदर्याचे रहस्य ? सोनम कपूर तिच्या वक्तव्यांमुळे किंवा लूक्सला घेऊन नेहमी ट्रोल होत असते. सोनमने 2018 मध्ये आनंद आहुजा या बिझनेसमनसह लग्नबंधनात अडकली होती. लग्नानंतर ती फारशी सिनेमातही झळकली नाही.'निरजा' आणि 'झोया फॅक्टर' या दोन सिनेमानंतर ती बालिवूडपासून लांब गेली. 

 

टॅग्स :सोनम कपूर