Join us  

अनेक वर्षांपासून या आजाराशी लढतेय सोनम कपूर, शेअर केला व्हिडीओ

By रूपाली मुधोळकर | Published: September 25, 2020 11:44 AM

अनिल कपूरची लाडकी लेक सोनम कपूर चित्रपटांपेक्षा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. आता ती एका नव्या पोस्टमुळे चर्चेत आहे.

ठळक मुद्देसुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर अनेकांनी सोनम कपूरलाही सोशल मीडियावर ट्रोल केले होते.

अनिल कपूरची लाडकी लेक सोनम कपूर चित्रपटांपेक्षा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. पोस्ट करणे आणि ट्रोल होणे, हे सोनमसाठी नवे नाही. आता ती एका नव्या पोस्टमुळे चर्चेत आहे. या पोस्टमध्ये सोनमने तिच्या आजाराबद्दल माहिती दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती या आजाराने पीडित आहे.सोनमने एक अनोखी इन्स्टाग्राम सीरिज सुरु केली आहे, या सीरिजचे नाव आहे, ‘स्टोरीटाइम विद सोनम’. या सीरिजमध्ये ती तिच्याबद्दलच्या काही कधीही जगापुढे न आलेल्या गोष्टी चाहत्यांशी शेअर करणार आहे. आपल्या पहिल्या स्टोरीत सोनमने तिच्या आजाराचा खुलासा केला आहे.

ती म्हणते, मी गेल्या अनेक वर्षांपासून पीसीओएस अर्थात पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम या आजाराने पीडित आहे. 14 ते 15 वर्षांची असतानापासून मी या आजाराच्या वेदना सहन करतेय. आत्तापर्यंत अनेक डॉक्टरांजवळ गेले, अनेक डायटीशियनचा सल्ला घेतला, कित्येक नॅचरोपॅथ्स व न्युट्रीशियन्सकडे गेले. मात्र आता मी चांगल्या स्थितीत आहे. यादरम्यान मी जे काही शिकले ते मला शेअर करायचे आहे, असे सोनम या व्हिडीओत सांगते.‘अनेक महिला या आजाराने पीडित आहेत. यामध्ये प्रत्येक प्रकरणात लक्षणे आणि प्रत्येकाचा संघर्ष वेगवेगळा असतो. मात्र योग्य आहार, वर्कआऊट आणि शिस्तबद्ध दिनचर्येचा प्रयत्न केल्यास मदत मिळते. सर्वप्रथम हा आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. रोज वॉक करा, योगा करा. या आजारात ताणतणाव सर्वात घातक आहे. त्यामुळे नको इतका ताण स्वत:वर येऊ देऊ नका. पीसीओडीसाठी साखर धोकादायक आहे. हा आजार असेल तर सर्वप्रथम साखरेचे सेवन बंद करा, असे सोनमने सुचवले आहे.

पीसीओएस  आजार काय आहेपीसीओएस हा स्त्रियांच्या प्रजननसंस्थेशी संबंधित आजार असून, यात इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या अंतस्त्रावांचे प्रमाण बिघडलेले असते. पीसीओएस हा आजार प्रामुख्याने बिघडलेल्या जीवनशैलीचा दुष्परिणाम आहे असंतुलित हॉर्मोन्समुळे ही समस्या उद्भवते. मासिक पाळी अनियमित झाल्यास देखील ही समस्या उद्भवते, ज्यामुळे महिलांसाठी गर्भधारणा कठीण होऊन जाते. मात्र तज्ज्ञांच्या मते, योग्य काळजी घेतल्यास पीसीओएसवर उपाय शक्य आहे.

अनेकदा ठरली ट्रोलिंगची शिकारसुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर अनेकांनी सोनम कपूरलाही सोशल मीडियावर ट्रोल केले होते. यावर सोनमने प्रतिक्रियाही दिली होती. एखाद्या फिल्म स्टारची मुलगी होणे ही माझ्यासाठी सन्मानाचा गोष्ट आहे आणि मला स्वत:च्या अस्तित्वावर अभिमान आहे, असे सोनमने म्हटले होते. अलीकडे एका ट्रोलरने सोनमसोबत तिचा पती आनंद आहुजा यालाही ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. तुझा पती जगातला सर्वात कुरूप पुरूष आहे, असे या युजरने लिहिले होते. यामुळे सोनम कपूर संतापली होती. अशा कमेंट प्रचंड वेदनादायी आहेत, असे सोनम म्हणाली होती.

तु त्याला हॉट समजतेस? पुन्हा एकदा बघ! नवर्‍याला कुरूप म्हणणार्‍या मुलीवर भडकली सोनम कपूर

डुक्करासोबत कधीच कुस्ती करू नये...! सोनम कपूरची ही पोस्ट कंगनासाठी तर नाही ना?

टॅग्स :सोनम कपूर