Join us

Sonam Kapoor : सोनम कपूरची पापाराझींना विनंती; म्हणाली माझा मुलगा वायू..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 16:49 IST

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने २० ऑगस्ट रोजी मुलाला जन्म दिला. तो आता 4 महिन्यांचा आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor)ने २० ऑगस्ट रोजी मुलाला जन्म दिला. तो आता 4 महिन्यांचा आहे. तिच्या मुलाचे नाव वायू (Vaayu) असे ठेवण्यात आले आहे. सोनमने सोशल मीडियावर वायूच्या फोटोंची झलकही दाखवली आहे. मात्र आज विमानतळावर सोनमने पापाराझींना वायूचे फोटो काढण्यास मनाई केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पापाराझाींना बघून सोनम कपूर म्हणाली..

काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये सोनम कपूर विमानतळावर दाखल झाली. गाडीतून उतरली असता तिच्याभोवती पापाराझी  (Paparazi) एकत्र आले. तिने पापाराझींना छान पोजही दिली. मात्र जाताना तिने ठणकावून सांगितले माझा मुलगा आहे त्याचा  फोटो घेऊ नका. यावर पापाराझी नाही घेणार म्हणाले, तर तिने त्यांचे आभार मानले.

सोनमने आजपर्यंत सोशल मीडियावर वायूचा चेहरा दाखवलेला नाही. सध्या बॉलिवुड मंडळी आपल्या मुलांबाबतीत फार पझेसिव्ह आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्मानेही (Anushka Sharma) आजपर्यंत मुलगी वामिकाला कॅमेऱ्यासमोर येऊ दिलेले नाही. तर आलिया भटनेही  (Alia Bhatt) अजून मुलगी राहा चा चेहरा दाखवलेला नाही.

टॅग्स :सोनम कपूरव्हायरल फोटोज्अनिल कपूर