गेल्या काहीकाळापासून अभिनेता अनिल कपूरची मुलगी एका अरबपती बिझनेसमॅनला डेट करीत आहे. बºयाचदा सोनमला तिच्या बॉयफ्रेंडसोबत बघण्यात आले आहे. सोनम गेल्या तीन वर्षांपासून दिल्ली बेस्ड बिझनेसमॅन आनंद आहुजा याला डेट करीत आहे. या दोघांना बºयाचदा विदेशात व्हेकेशन एन्जॉय करताना बघण्यात आले आहे. सूत्रानुसार, सोनम आणि आनंद २०१८ मध्ये विवाहाच्या बंधनात अडकण्याची शक्यता आहे. लग्नासाठी दोघांनी जोधपूरमध्ये लोकेशनही बुक केल्याची माहिती समोर येत आहे. याच ठिकाणी सर्व लग्नविधी पार पडणार आहेत.
आनंद Bhane या फॅशन ब्रॅण्डचा मालक आहे. त्याने अमेरिकेतील व्हार्टन बिझनेस स्कूल येथून आपले शिक्षण पूर्ण केले. सोनमचा Bhane हा फेव्हरेट ब्रॅण्ड आहे. त्यामुळे बºयाचदा सोनम Bhane ने डिझाइन केलेले कपडे परिधान करून स्पॉट झाली आहे. आनंदचे वर्षाकाठीचे उत्पन्न सुमारे २८ अरब इतके आहे. त्यामुळे असे म्हटले जात आहे की, सोनमचे लग्नही अनुष्काच्या लग्नाप्रमाणेच शाही पद्धतीने पार पडेल.
दरम्यान, २०१८ मध्ये अनिल कपूरच्या परिवारात दोन विवाह होणार आहेत. त्यामध्ये सोनमचा कझिन मोहित मारवाह फेब्रुवारीमध्ये आपली लॉन्ग टाइम गर्लफ्रेंड अंतरा मोतीवाला हिच्याशी लग्न करणार आहे. हा विवाहसोहळा दुबईमध्ये पार पडण्याची शक्यता आहे, तर याच वर्षांत सोनमही तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. सोनमच्या लग्नाची आतापासूनच तयारी केली जात आहे.