Join us

भावाचे लग्न सोडून बॉयफ्रेंडसोबत बीचवर फिरताना दिसली सोनम कपूर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 22:16 IST

अभिनेत्री सोनम कपूर सध्या यूएई येथे असून, भाऊ मोहित मारवाह याच्या लग्नात सहभागी झाली आहे. याठिकाणी ती तिचा बॉयफ्रेंड आनंदसोबत क्वॉलिटी टाइम स्पेंड करीत आहे.

‘पॅडमॅन’ची अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिच्या आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या शूटिंगबरोबर कौटुंबिक सोहळ्यांमध्ये व्यस्त आहे. नुकताच तिचा चुलत भाऊ मोहित मारवाह याचा विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्यात सोनमव्यतिरिक्त अर्जुन कपूर, बहीण रेहा कपूर, वडील अनिल कपूर सहभागी झाले होते. त्याचबरोबर अभिनेत्री श्रीदेवीदेखील मुलगी जान्हवी आणि पती बोनी कपूरसोबत उपस्थित होती. हे सर्व सेलिब्रिटी मोहितच्या लग्नात खूप व्यस्त होते. मात्र अशातही सोनमने बॉयफ्रेंडला वेळ देत त्याच्यासोबत बीचवर फेरफटका मारला. होय, लग्नाचे वातावरण असतानाही सोनम बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत क्वॉलिटी टाइम स्पेंड करताना बघावयास मिळाली. सोनम आनंदसोबत बीचवर फिरताना दिसली. या दोघांचा बीचवर फिरतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सोनमने आनंदचा हात पकडला असून, ती एकटक कॅमेºयाकडे बघत आहे. शिवाय आनंदसोबत काहीतरी बोलतही आहे. तुमच्या माहितीसाठी हे लव्ह बडर््स सध्या यूएई येथे आहेत. सोनम मोहितच्या लग्नासाठी यूएई येथे पोहोचली होती. या लग्नात सोनमचा बॉयफ्रेंड आनंदला आमंत्रित केले होते.  सोनम कपूर आणि अर्जुन कपूरचा चुलत भाऊ आणि बॉलिवूड अभिनेता मोहित मारवाह याने २० फेब्रुवारी रोजी आपली गर्लफ्रेंड अंतरा मोतीवाला याच्याशी लग्न केले. लग्नाच्या एक दिवस अगोदर म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी मोहित आणि अंतराची मेहंदी आणि संगीत सेरेमनी होती. या सोहळ्यात अनिल कपूर, रेहा कपूर, श्वेता बच्चन, करण जोहर, मनीष मल्होत्रा सहभागी झाले होते.