Join us

जावई माझा भला...! अनिल कपूर यांची जावयासाठी ‘लई भारी’ पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 15:21 IST

आनंदसाठी सोनमने एक सुंदर पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीय. पण त्याहीपेक्षा सासरेबुबांनी जावईबापूंसाठी केलेली पोस्ट खास आहे. 

ठळक मुद्देसोनम व आनंद दोघेही 2018 साली लग्नबंधनात अडकले होते. आनंद हा एका दिल्लीचा मोठा बिझनेसमॅन आहे.

सोनम कपूरचा (Sonam Kapoor) पती आनंद आहुजा (Anand Ahuja) याचा आज वाढदिवस. आता वाढदिवस म्हटल्यावर सोनमच्या शुभेच्छा तर मिळणारच. आनंदसाठी सोनमने एक सुंदर पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीय. पण त्याहीपेक्षा सासरेबुबांनी जावईबापूंसाठी केलेली पोस्ट खास आहे. सोनमने आनंदला बर्थ डे विश करताना एक गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोत सोनम व आनंद रोमॅन्टिक मूडमध्ये दिसत आहेत.

‘हॅपी बर्थ डे माय लाईफलाईन... तू मला मिळालेलं सर्वात मोठं गिफ्ट आहेस. बेस्ट पार्टनर, बेस्ट लव्हर आणि बेस्ट फ्रेंड, लव्ह यू माय बेबी,’ असं तिनं या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय.बायकोची ही पोस्ट पाहून आनंद हुरळला असेल. पण सासरे बुबा अर्थात अनिल कपूर  (Anil Kapoor) यांची पोस्ट वाचून आनंदचे पाय जमिनीवर नसणार, हे आम्ही दाव्यानिशी सांगू शकतो.

होय, अनिल कपूर यांनी जावयासाठी शानदार पोस्ट शेअर केली आहे. ‘आम्ही आमच्या मुलीला खरं प्रेम आणि ख-या मनाची व्यक्ति शोधणं शिकवलं.  हे एक कठीण काम होतं आणि अशात तू तिला भेटलास... हॅपी बर्थ डे आनंद...,’ असं अनिल यांनी लिहिलं आहे. सास-याकडून असं कौतुक होणं, हे कोणत्या जावयाला आवडणार नाही, नाही का?सोनम व आनंद दोघेही 2018 साली लग्नबंधनात अडकले होते. आनंद हा एका दिल्लीचा मोठा बिझनेसमॅन आहे. त्याचे शिक्षण अमेरिकेत झाले आहे. आनंद फॅशन ब्राँड इँंल्ली चा मालक आहे. सोनमचा इँंल्ली हा फेव्हरेट ब्रँड आहे. त्यामुळे बºयाचदा सोनम इँंल्ली ने डिझाइन केलेले कपडे परिधान करून स्पॉट झाली आहे. आनंदची आणखी एक वेगळी ओळख म्हणजे, तो प्रसिद्ध बिझनेसमॅन हरीश अहुजा यांचा नातू आहे. आनंदचे वर्षाकाठीचे उत्पन्न अब्जावधीच्या घरात आहे. आनंदला फिरण्याशिवाय शूज आणि कारची आवड आहे.

टॅग्स :अनिल कपूरसोनम कपूर