Sonam Kapoor Baby Boy First Photo : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर दुसऱ्यांदा आई झाली आहे. सोनम आणि तिचा पती आनंद अहुजा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन ही गुड न्यूज सर्वांसोबत शेअर केली. २९ मार्च २०२६ रोजी सोनम आणि आनंदला मुलगा झाला. आता या चिमुकल्याची पहिली झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सोनमची बहीण आणि बाळाची मावशी रिया कपूर हिने हा खास फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
रिया कपूरने सोशल मीडियावर बाळाचा फोटो शेअर करत त्याला एक सुंदर कॅप्शन दिले. तिने लिहिले, "तुम्हाला फक्त याचीच गरज असते आणि सोनम कपूरच्या बाबतीत सांगायचं तर, एका 'सुपरह्युमन' मातेच्या ताकदीची". या फोटोवर फराह खान, महीप कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांसारख्या दिग्गज सेलिब्रिटींनी कमेंट्स करत आनंद व्यक्त केला.
सोनम कपूर आणि बिझनेसमन आनंद आहुजा यांनी ८ मे २०१८ रोजी मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली होती. या लग्नात बॉलिवूडच्या दिग्गजांनी हजेरी लावली होती. लग्नानंतर ४ वर्षांनी म्हणजेच २०२२ मध्ये सोनमने पहिल्या मुलाला जन्म दिला होता, ज्याचे नाव 'वायू' ठेवण्यात आले. आता दोन वर्षांनंतर सोनम पुन्हा एकदा आई झाली.
Web Summary : Sonam Kapoor and Anand Ahuja welcomed their second child, a baby boy, on March 29, 2026. Rhea Kapoor, Sonam's sister, shared the first glimpse of the baby, delighting fans. Celebrities like Farah Khan expressed their joy.
Web Summary : सोनम कपूर और आनंद आहूजा ने 29 मार्च, 2026 को अपने दूसरे बच्चे, एक बेटे का स्वागत किया। सोनम की बहन रिया कपूर ने बच्चे की पहली झलक साझा की, जिससे प्रशंसक खुश हो गए। फराह खान जैसी हस्तियों ने खुशी व्यक्त की।