‘दबंग3’ने वाढवली सोनाक्षीची चिंता!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 17:48 IST
सलमान खानचा ‘दबंग3’ सध्या बॉलिवूडमधील हॉट टॉपिक बनलायं. कबीर खानच्या ‘ट्यूबलाईट’चे शूटींग संपले रे संपले की सलमान ‘दबंग3’चे शूटींग ...
‘दबंग3’ने वाढवली सोनाक्षीची चिंता!!
सलमान खानचा ‘दबंग3’ सध्या बॉलिवूडमधील हॉट टॉपिक बनलायं. कबीर खानच्या ‘ट्यूबलाईट’चे शूटींग संपले रे संपले की सलमान ‘दबंग3’चे शूटींग सुरु करणार आहे. या चित्रपटाची स्टारकास्ट जवळजवळ सारखीच राहणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. पण या स्टारकास्टमध्ये एक चेहरा नवीन असणार आहे आणि याच नव्या चेहºयामुळे ‘लीड लेडी’ सोनाक्षी सिन्हा हिची चिंता वाढली आहे. होय, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दबंग ३’मध्ये केवळ सोनाक्षीच नाही तर आणखी एक हिरोईन असणार आहे आणि तिची भूमिकाही अतिशय दमदार व महत्त्वपूर्ण राहणार आहे. यामुळेच सोनाक्षीची चिंता वाढली आहे. ‘दबंग’व ‘दबंग2’मध्ये सोनाक्षी भाव खाऊन गेली होती. ‘दबंग२’मध्ये तर सलमानसोबत काही स्टंट करण्याची संधीही तिला मिळाली होती. हे पाहता ‘दबंग3’मध्ये आपली भूमिका कुठेही उणी पडू नये, असे सोनाक्षीला वाटते आहे. त्यामुळेच सोनाक्षीने अरबाजला फोन करून यातील तिची भूमिका अधिक दमदार असावी अशी गळ घातली आहे. मात्र अरबाजने याबाबत सोनाक्षीला कुठलीही खात्री दिलेली नाही. कारण दुसरी लीड लेडी सोनाक्षीपेक्षा दमदार भूमिकेत असावी, असा खुद्द सलमानचा आग्रह आहे. अशास्थितीत सोनाक्षीची संभ्रमावस्था आपण समजू शकतो. सोनाक्षी ‘दबंग3’बाबत तोलूनमापून बोलतेय, ते यामुळेच.