त्याचबरोबर सध्या या चित्रपटाच्या कास्टचा शोध घेतला जात आहे. अशात एक शॉकिंग न्यूज समोर येत असून, ‘दबंग-३’मधून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट केल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. होय, या चित्रपटात सोनाक्षीला छोट्या पडद्यावरील नागीन मौनी रॉय रिप्लेस करणार आहे. सूत्रानुसार, मौनी ‘दबंग-३’ टीमला अॅप्रोच झाली असून, ती सलमानसोबत काम करण्यास प्रचंड उत्सुक आहे. खरं तर सलमानलाच मौनीसोबत काम करायचे असून, तिने तिचा जलवा आता मोठ्या पडद्यावर दाखवावा अशी त्याची इच्छा आहे. दरम्यान, असेही म्हटले जात आहे की, अक्षयकुमारच्या ‘गोल्ड’ या चित्रपटातही सलमानच्या सांगण्यावरूनच मौनीला संधी मिळाली आहे.
मात्र ‘गोल्ड’च्या दिग्दर्शकांच्या मते, आॅडिशननंतरच मौनीला साइन करण्यात आले आहे. पण काहीही असो, ही बाब जगजाहीर आहे की, सलमान मौनीला पसंत करतो. काही दिवसांपूर्वीच मौनीला त्याने बिग बॉसच्या व्यासपीठावर आमंत्रित केले होते. तिच्यासोबत एका रोमॅण्टिक गाण्यावर डान्सही केला होता. तसेच मौनी बिग बॉसी सीजन-११च्या प्रोमोमध्येही झळकली होती. एकूणच सलमान मौनीसोबत कुठल्या ना कुठल्या कारणाने स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. जेणेकरून मोठ्या पडद्यावर सलमानच्या चाहत्यांनी मौनीला पसंत करावे.