Join us

सोनाक्षी सिन्हा म्हणतेय, सिनेमात अभिनेता असो वा नसो; नो टेन्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2017 19:07 IST

आगामी ‘नूर’ या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा म्हणतेय की, अभिनेत्याव्यतिरिक्त सिनेमाच्या यशस्वतेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारताना मला ...

आगामी ‘नूर’ या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा म्हणतेय की, अभिनेत्याव्यतिरिक्त सिनेमाच्या यशस्वतेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारताना मला अजिबात टेन्शन येत नाही, तर उलट मी स्वत:ला खूपच रिलॅक्स फिल करते. सोनाक्षीने या अगोदर ‘अकिरा’ या महिलाप्रधान सिनेमात काम केले आहे. ज्यामध्ये मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत कोणीच नव्हते. आयएएनएस या न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार सोनाक्षीने गेल्या मंगळवारी ‘नूर’च्या ट्रेलर लॉन्चिंगप्रसंगी म्हटले की, मला नाही माहित हे सोपे आहे की अवघड, मात्र जेव्हा मी सिनेमाच्या प्रमोशनसाठी बाहेर पडते, तेव्हा मी स्वत:ला रिलॅक्स फिल करते. ‘अकिरा’च्या प्रमोशनदरम्यान मी हा अनुभव घेतला आहे. माझ्यासोबत एक अनुभवी टीम आहे. त्यामुळे मला कोणाचीही गरज नाही, असेही सोनाक्षीने सांगितले. पुढे बोलताना सोनाक्षीने म्हटले की, खरं तर एखाद्या सिनेमाच्या यशस्वीतेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारणे हा मजेशीर असा अनुभव असतो. दरम्यान, गेल्या मंगळवारी सोनाक्षीच्या सिनेमाचे ट्रेलर लॉन्च करण्यात आले असून, यामध्ये ती वेंधळ्या मुलीच्या भूमिकेत दिसत आहे. सिनेमात ती एक जर्नालिस्ट दाखविण्यात आली असून, तिची कामगिरी जोकरसारखी असल्याचे तिच सांगताना ट्रेलरमध्ये दिसत आहे. ट्रेलरमध्ये दिसत असलेली ‘नूर’ तिच्या वाटेत येणाºया प्रत्येक वस्तूला धडकताना दिसत असून, तिला तिच्या आयुष्याचा तिटकारा वाटत आहे. या सिनेमात १९७० मध्ये आलेल्या ‘द ट्रेन’ या सिनेमातील ‘गुलाबी आंखें जो तेरी देखी’ या गाण्याचे रिमिक्स दाखविण्यात येणार असून, त्यावर सोनाक्षी थिरकताना दिसणार आहे. हा सिनेमा २१ एप्रिल रोजी रिलीज होणार असून, सोनाक्षी सध्या या सिनेमाच्या प्रमोशनसाठी जागाजोगी फिरताना दिसत आहे.