Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाक्षी सिन्हा या आजाराने आहे ग्रस्त, अरबाजच्या शोमध्ये स्वत: केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 12:45 IST

सोनाक्षी सिन्हा लवकरच करण जोहरच्या मल्टीस्टारर 'कलंक'मध्ये दिसणार आहे. १७ एप्रिलला महावीर जयंतीच्या दिवशी कलंक रसिकांच्या भेटीला येणार आहे.

ठळक मुद्दे सोनाक्षीने अरबाज खानच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होतीतिने पर्सनल लाईफबाबत काही खुलासे केले

सोनाक्षी सिन्हा लवकरच करण जोहरच्या मल्टीस्टारर 'कलंक'मध्ये दिसणार आहे. १७ एप्रिलला महावीर जयंतीच्या दिवशी कलंक रसिकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच सोनाक्षीने अरबाज खानच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने पर्सनल लाईफबाबत काही खुलासे केले. सोशल मीडियावर अनेक वेळा सोनाक्षीला लग्न करुन सेटल होण्याचा सल्ला देण्यात येतो.

यावेळी सोनाक्षीने ट्रोलर्सना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. आयुष्याचा अर्थ फक्त लग्न करुन सेटल व्हा ऐवढाच आहे का.? आम्ही टूरवर जातो तर त्यांना वाटत का आम्ही नाचायला, मजा करायला, पार्टी करायला गेलो आहोत?, आम्ही काम करायला जातो. 

सोनाक्षीने शोमध्ये तिच्या आजाराबाबत देखील खुलासा केला. असे गडबडून जाऊ नका, सोनाक्षीला सध्या मोबाईल  फोनच्या आहारी जाण्याचा आजार झाला आहे. ऐवढेच नाही तर  बाथरुममध्ये देखील सोनाक्षी सिन्हा मोबाईल बरोबर घेऊन जाते. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर एप्रिल महिन्यापासून दबंग3 चे शूटिंग सुरु होणार आहे. यात सलमानच्या अपोझिट सोनाक्षी सिन्हा दिसणार आहे. २०१० मध्ये ‘दबंग’ प्रदर्शित झाला होता. यानंतर २०१२ मध्ये ‘दबंग 2’ने बॉक्सआॅफिसवर धूम केली होती. सलमान व सोनाक्षीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यामुळे दबंग3 मध्ये देखील सलमानच्या अपोझिट सोनाक्षीला कास्ट करण्यात आले आहे. या सिनेमा याचवर्षी डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :सोनाक्षी सिन्हादबंग 3कलंक