Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाक्षी सिन्हा का करतेय मुंबई भ्रमंती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 18:49 IST

‘बॉलिवूडची दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा ही चित्रपटाच्या माध्यमातून वेगवेगळे विषय हाताळणारी अभिनेत्री म्हणून नावारूपास येत आहे. ‘अकिरा’ या अ‍ॅक्शनपटात ...

‘बॉलिवूडची दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा ही चित्रपटाच्या माध्यमातून वेगवेगळे विषय हाताळणारी अभिनेत्री म्हणून नावारूपास येत आहे. ‘अकिरा’ या अ‍ॅक्शनपटात केलेल्या अभिनयामुळे समीक्षकांबरोबरच चाहत्यांचीही वाहवा मिळवली. आता ती पुन्हा एकदा ‘नूर’ या तिच्या आगामी चित्रपटातून महिला पत्रकाराच्या भूमिके साठी सज्ज झाली आहे. चित्रपटातील तिचा को-स्टार पुरब कोहली याच्यासोबत तिने नुकतेच एक रोमँटिक गाणे शूट केले आहे. यानिमित्ताने सोनाक्षीने चक्क अख्खी मुंबईची भ्रमंती करून घेतली. वडाळातील सॉल्ट पॅन, बीपीटी कॉलनी, रेल्वे यार्ड, वरळी फोर्ट आणि सिमेंट यार्ड येथे ते दोघे एकमेकांच्या हातात हात घालून फिरतांना दिसले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सोनाक्षीची व्यक्तीरेखा जेव्हा फोटो जर्नालिस्ट असलेल्या ‘अयान’ या पूरब कोहलीच्या व्यक्तीरेखेच्या प्रेमात पडते तेव्हा हे नुकतेच शूट करण्यात आलेले गाणे दाखविण्यात येणार आहे. त्याच्या प्रेमात पडतांनाच ती पुन्हा एकदा मुंबईच्याही प्रेमात पडलीय. दिग्दर्शक सुनील सिप्पी यांनी या ठिकाणाचे फोटो काही वर्षांपूर्वी क्लिक केले होते. त्यांनी तेव्हाच हे ठरवले की, याठिकाणी आपण चित्रपटातील एखादे गाणे शूट नक्की करायचे. सुनील सिप्पी याविषयी बोलताना म्हणाले,‘मुंबईच्या दक्षिण भागातील हे काही सीन्स आहेत. या जागेवर माझी अनेक वर्षांपासून नजर होती. या शहराचे सौंदर्यच काही और आहे.’सोनाक्षी सिन्हा चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. पत्रकाराची भूमिका तिला कित्येक वर्षांपासून करण्याची इच्छा होती. ही भूमिका तिच्यासाठी खरंच स्वप्नवतच आहे. या भूमिकेसाठी ती प्रचंड मेहनत घेताना दिसतेय. पाहुयात, पत्रकाराच्या भूमिकेतील दिसते तरी कशी?