सोनाक्षी सिन्हाला विचारायचेय सलमान खान कधी लग्न करणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 16:59 IST
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नूर या चित्रपटात पत्रकाराची भूमिका करतीय. पत्रकार असती तर सोनाक्षी सिन्हाने सलमान खानला कोणता प्रश्न विचारला ...
सोनाक्षी सिन्हाला विचारायचेय सलमान खान कधी लग्न करणार?
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नूर या चित्रपटात पत्रकाराची भूमिका करतीय. पत्रकार असती तर सोनाक्षी सिन्हाने सलमान खानला कोणता प्रश्न विचारला असता यावर तिने सांगितले, तुझे लग्न कधी होणार? हा मुख्य प्रश्न विचारला असता.सोनाक्षीने ‘नूर’ या चित्रपटाच्या प्रमोशनला प्रारंभ केला आहे. सुनील सिप्पी हे या चित्रपटाचे निर्माते असून, सबा इम्तियाज यांच्या ‘यू आर किलींग मी’ या कादंबरीवर आधारित आहे. आपले वडील शत्रुघ्न सिन्हा यांना कोणता प्रश्न विचारला असता, यावर ती म् हणाली, ‘मी असा प्रश्न विचारेन, ज्याचे उत्तर खामोश असे असणार नाही’या चित्रपटाविषयी बोलताना सोनाक्षी म्हणते, ‘हा चित्रपट करताना मला भीती न वाटता, जबाबदारी समजून काम केले आहे. सोनाक्षीने यापूर्वीही असे अनेक चित्रपट केले आहेत. अर्थात तिला हॉलिवूडमध्ये जाण्याबाबत कोणताही इंटरेस्ट नाही.सोनाक्षीचा हा चित्रपट २१ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये कनन गिल आणि पूरब कोहली यांच्याही भूमिका असणार आहेत.