Join us

सोनाक्षी सिन्हाला ‘थप्पड से नही’ तर उत्तेजक सीन्स देण्यास वाटते भीती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 16:44 IST

दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने एका मुलाखतीत उत्तेजक सीन्स देण्यास भीती वाटत असल्याचे म्हटले आहे. वाचा तिने नेमके काय म्हटले?

बॉलिवूडमध्ये बोल्ड सीन देणे काही नवे नाही. सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींनीदेखील बोल्ड सीन देऊन धूम उडवून दिली आहे. परंतु अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यास अपवाद आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. कारण तिच्या मते, तिला ‘थप्पड से नही’ तर बोल्ड सीन देण्यास भीती वाटते. याबाबत सोनाक्षीने म्हटले की, ‘बºयाचशा अभिनेत्रींची काही ना काही कमजोरी असते. तशीच एक कमजोरी माझीदेखील आहे. मला चित्रपटात उत्तेजक सीन्स देण्यास भीती वाटते. ‘दबंग’ या चित्रपटातून सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये एंट्री करणाºया सोनाक्षीने आतापर्यंत अक्षयकुमार, अजय देवगण यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम केले. पण अशातही सोनाक्षी खूपच कमी वेळा बोल्ड अंदाजात बघावयास मिळाली. मात्र आगामी ‘इत्तेफाक’ या चित्रपटात ती सिद्धार्थ मल्होत्राबरोबर उत्तेजक सीन्स देताना बघावयास मिळणार असल्याचा खुलासा निर्माता करण जोहरने केला आहे. करण जोहर आणि शाहरुख खान यांच्या प्रॉडक्शन हाउसचा ‘इत्तेफाक’ हा चित्रपट या आठवड्यात रिलीज होत आहे. गेल्या बुधवारी करण जोहर संपूर्ण चित्रपटाच्या कास्टसोबत एका मुलाखतीत बघावयास मिळाला. या मुलाखतीत करणने सांगितले की, ‘चित्रपटात सोनाक्षीचा खूपच वेगळा अंदाज बघावयास मिळणार आहे.’ यावेळी सोनाक्षीसह सिद्धार्थ मल्होत्रा आणि अक्षय खन्ना हेदेखील उपस्थित होते. यावेळी करणने सोनाक्षीला विचारले की, ‘तुला सिद्धार्थ मल्होत्रासोबत उत्तेजक सीन करताना मजा आली काय? त्यावर सोनाक्षीने म्हटले की, ‘मी कॅमेºयासमोर उत्तेजक सीन देताना खूपच खाबरत असते. मात्र मी एक चांगली अभिनेत्री असल्याने ते समजून येत नाही. मात्र घाबरते हे तेवढेच खरे आहे. पुढे बोलताना सोनाक्षीने म्हटले की, ‘केवळ सिद्धार्थच नव्हे तर प्रत्येक अभिनेत्यासोबत अशाप्रकारचे सीन देताना मी घाबरते. खरं तर जेव्हा मी या चित्रपटाची स्क्रीप्ट वाचली तेव्हाच हा चित्रपट करण्याचे ठरविले होते. परंतु त्याचबरोबर घाबरलेदेखील होते. कारण हा चित्रपट माझ्या करिअरमधील सर्वात वेगळा चित्रपट आहे. ‘इत्तेफाक’ ३ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. १९६९ मध्ये आलेल्या यश चोपडांच्या ‘इत्तेफाक’चा हा रिमेक आहे. यामध्ये सोनाक्षी सिन्हा, सिद्धार्थ मल्होत्रा आणि अक्षय खन्ना बघावयास मिळणार आहेत.