Join us

​सोनाक्षी म्हणते, मीच रज्जो होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2016 12:25 IST

सोनाक्षी सिन्हा आणि सलमान खान यांच्यात काहीतरी बिनसल्याचे मध्यंतरी ऐकवात आले. यानंतर ‘दबंग3’मधून सोनाक्षीचा पत्ता कट, अशीही बातमी आली. ...

सोनाक्षी सिन्हा आणि सलमान खान यांच्यात काहीतरी बिनसल्याचे मध्यंतरी ऐकवात आले. यानंतर ‘दबंग3’मधून सोनाक्षीचा पत्ता कट, अशीही बातमी आली. मात्र सोनाक्षीने या सर्व बातम्या बकवास असल्याचे म्हटले आहे. एका मुलाखतीत सोनाने हा खुलासा केला. ‘दबंग3’ मीच करणार. कथेत रज्जोची भूमिका असेल तर ती मीच करेल. दुसरी तिसरी कुठलीही अभिनेत्री रज्जोची भूमिका करणार नाही. मी आज जे काही आहे, ते ‘दबंग’मुळे आहे. मी या चित्रपटाच्या फ्रेंचाइजीसाठी नेहमीच तयार आहे, असे सोना म्हणाली. ‘दबंग3’मध्ये सोनाक्षी कॅमिओ करू शकते, अशीही खबर होती. याबद्दल विचारले असता सोनाने आणखीच खोलात जाऊन माहिती दिली.‘बघा, अद्याप काहीही ठरलेले नाही. अद्याप स्क्रीप्ट सुद्धा फायनल झालेली नाही. त्यावर काम सुरु आहे. खरे तर ‘दबंग3’ प्रीक्वल असेल की सीक्वल, हेही ठरलेले नाही’, असे सोनाने सांगितले. ‘दबंग3’च्या शूटींगला अद्याप बराच अवकाश आहे. अशात काहीही बदलू शकते. कदाचित स्क्रीप्टमधील रज्जोची व्यक्तिरेखाच बाद होऊ शकते, हेही सांगायला सोनाक्षी विसरली नाही. आता सोनाक्षीला नेमके काय सांगायचेय, हे तीच जाणो!!