‘सोना’ च्या ‘नूर’ मध्ये सनीही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2016 15:05 IST
सनी लिओनीने एखाद्या चित्रपटात केमिओ जरी केला तरी इतका ‘भाव’ खाऊन जाते की, मुख्य अभिनेत्रीला काही अर्थच उरत नाही. ...
‘सोना’ च्या ‘नूर’ मध्ये सनीही?
सनी लिओनीने एखाद्या चित्रपटात केमिओ जरी केला तरी इतका ‘भाव’ खाऊन जाते की, मुख्य अभिनेत्रीला काही अर्थच उरत नाही. वेल, पण आता तसे होणार नाही. कारण, सनी लवकरच ‘नूर’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती सोनाक्षी सोबत दिसणार आहे.या चित्रपटात सोनाक्षी पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार असून सनीसोबत तिने तीन ते चार दिवस शूटींग केली आहे. दिग्दर्शक म्हणतात की, सनीला असा रोल मिळाला आहे की, जी भूमिका केवळ तीच करू शकते.याविषयी बोलतांना ‘नूर हा चित्रपट हा अगदी साध्या कथानकावर आधारित असून नूर ही अपघातानेच पत्रकार बनते. काहीही टेन्शन न देणारा आणि अगदी साधा असा चित्रपट असून एका मुलीची ती कहानी आहे.