म्हणून खर्या आयुष्यात इतकी ग्लॅमरस दिसते श्रीदेवी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2017 13:24 IST
‘मॉम’ या आपल्या आगामी चित्रपटात श्रीदेवी ‘नो मेकअप लूक’मध्ये दिसणार आहे. खरे तर ‘नो मेकअप लूक’मध्ये कॅमे-यासमोर उभे राहण्याची ...
म्हणून खर्या आयुष्यात इतकी ग्लॅमरस दिसते श्रीदेवी!
‘मॉम’ या आपल्या आगामी चित्रपटात श्रीदेवी ‘नो मेकअप लूक’मध्ये दिसणार आहे. खरे तर ‘नो मेकअप लूक’मध्ये कॅमे-यासमोर उभे राहण्याची श्रीदेवीची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीच अनेक चित्रपटात ती अशा लूकमध्ये दिसली आहे. मेकअप न करता कॅमेºयासमोर जाण्यास बहुधा अभिनेत्री धजावत नाहीत. पण श्रीदेवीची गोष्टच न्यारी. मेकअपबद्दल श्रीदेवीचे काही वेगळेच मत आहे. व्यक्तिरेखेची गरज नसेल तर मेकअप करायचे नाही,असे श्रीदेवी मानते.मी कॅमेºयासमोर असते तेव्हा मी माझी नसतेच. मी केवळ अॅक्टर असते. पडद्यावर सुंदर दिसण्यात मला रस नाही.मला फक्त पडद्यावर माझी भूमिका जगण्यात रस आहे. माझी जी व्यक्तिरेखा आहे, मी हुबेहुब तसेच दिसावे, असे मला वाटते. मी मेकअपला कधीच अतिमहत्त्व दिलेले नाही. ‘इंग्लिश-विंग्लिश’मध्ये शशी मेकअपमध्ये दिसली असती तर कशी वाटली असती? केवळ ‘मॉम’मध्येच नाही तर ‘सदमा’मध्ये सुद्धा मी एक वेडी- वाकडी वेणी घालून कॅमेºयापुढे गेले होते. कारण मी त्यात एक मेंटली डिस्टर्ब मुलीच्या भूमिकेत होते. प्रत्येक भूमिकेची एक गरज असते. आता ‘सदमा’मध्ये मी मेकअप न करता कॅमेºयासमोर गेले पण म्हणून ‘हवा-हवाई’मध्ये मी विदाऊट मेकअप दिसले असते तर ते विचित्र वाटले असते. ज्या भूमिकेला मेकअपची गरज आहे, तिथे ते करावेच लागते. पण माझ्याबाबतीत म्हणाल तर मी मेकअपला कधीच प्राधान्य दिले नाही. सुंदर दिसण्यासाठी माझे स्वत:चे आयुष्य आहे ना, असे ती म्हणाली.ALSO READ : श्रीदेवीची लेक जान्हवी कपूरने खरचं केली का कॉस्मेटिक सर्जरी?अलीकडे विनाकारण मेकअप वा अति मेकअप करण्यास मनाई केली जाते. चित्रपटसृष्टीत अशा चित्रपटांचा ट्रेंड आलाय, हे माझ्यासाठी सुखावह आहे, असेही ती म्हणाली. आता यावरून श्रीदेवीच्या खºया सौंदर्याचे रहस्य तुम्हाला कळले असेलच.