Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून ‘पद्मावत’चे शूटींग पूर्ण होईपर्यंत हॉटेलमध्ये राहिला शाहिद कपूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 16:13 IST

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत या दोघांचे सध्या मस्त चाललेयं. दोघेही आपल्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत. अलीकडे या आनंदी ...

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत या दोघांचे सध्या मस्त चाललेयं. दोघेही आपल्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत. अलीकडे या आनंदी जोडप्याने नेहा धूपियाच्याBFFs With Vogue या टॉक शोमध्ये हजेरी लावली. आता शाहिद व मीरा एकत्र आल्यावर काय झाले असेल याची कल्पना आपण करू शकतोचं. दोघांनीही एकमेकांबद्दल ब-याच गोष्टी शेअर केल्यात. नेहाच्या खट्याळ प्रश्नांना तितकीच खट्याळ उत्तरे दिलीत. काही खुलासेही केलेत. यातला एक खुलासा होता, शाहिद कपूर ‘पद्मावत’च्या शूटींगमध्ये बिझी असतानांचा. होय, ‘पद्मावत’चे शूटींग सुुरू असताना शाहिदने घरी येऊच नये, असे मीराला वाटत होते. त्यामुळेच शाहिदला ‘पद्मावत’चे शूटींग संपेपर्यंत चक्क हॉटेलमध्ये राहावे लागले होते. आश्चर्य वाटले ना?  पण हे खरे आहे. यामागची अख्खी स्टोरी मीराने सांगितली. तिने सांगितले की, ‘पद्मावत’चे शूटींग संपवून शाहिद सकाळी ८ वाजता घरी परतायचा आणि मग दुपारी २ वाजेपर्यंत झोप काढायचा. पण नेमक्या याचवेळी मीशाला खेळायचे असायचे.  शाहिद कधीच काही बोलला नाही. पण शाहिदला विश्रांतीची गरज होती आणि मला मीशाला खेळू द्यायचे होते. यातून मार्ग काढण्यासाठी मीच शाहिदला हॉटेलमध्ये राहण्याचा पर्याय सुचवला. याठिकाणी त्याला निवांत झोप मिळणार होती. शाहिदलाही हे पटले आणि त्याने लगेच ‘पद्मावत’च्या सेटच्या जवळचे एक हॉटेल बुक केले. ‘पद्मावत’चे शूटींग पूर्ण होईपर्यंत तो याच हॉटेलात राहिला.मीराने सांगितलेला हा किस्सा बघता, एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे मीरा एक जितकी चांगली आई आहे, तितकीच चांगली पत्नीही आहे. असे नसते तर शाहिदच्या विश्रांतीची तिने इतकी पर्वा केली नसतीच.ALSO READ : OMG! ​ शाहिद कपूरच्या गैरहजेरीत एकटी इव्हेंटमध्ये पोहोचली मीरा राजपूत, लोकांनी केले दुर्लक्ष!!