Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून ‘शहेनशाह’ बिग बी अमिताभ बच्चन यांचा मूड बिघडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 11:28 IST

बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सशी संवाद साधत असतात. प्रत्येक गोष्ट ते आपल्या फॅन्सशी सोशल नेटवर्किंग ...

बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सशी संवाद साधत असतात. प्रत्येक गोष्ट ते आपल्या फॅन्सशी सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर करतात. आपला सिनेमा, केबीसी किंवा समाजातील घडणा-या गोष्टी, खेळाचे रिझल्ट यासह विविध गोष्टीं संदर्भातील पोस्ट बिग बी सोशल मीडियावर शेअर करतात. दिलखुलासपणे बिग बी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना फॅन्ससह शेअर करतात. मात्र नुकतंच बिग बी यांनी शेअर केलेली एक पोस्ट या सगळ्याला अपवाद ठरली आहे. ही पोस्ट वाचून बिग बींचं काही तरी बिनसलं असून त्यांचा मूड बिघडल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या 11 ऑक्टोबरला बिग बी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. बिग बींचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या फॅन्ससाठी जणू काही दिवाळी दसराच. त्यांचे फॅन्स दरवर्षी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. आपल्या लाडक्या महानायकाचा वाढदिवस फॅन्स विविध पद्धतीने साजरा करतात. यंदा तर बिग बींचा वाढदिवस आणखी खास आहे. कारण बिग बींचा यंदा 75वा वाढदिवस आहे. बिग बींचा अमृत महोत्सवी वाढदिवसाचं सेलिब्रेशन विशेष आणि स्पेशल पद्धतीने साजरा करण्याचे प्लान्स त्यांच्या फॅन्सनी आखले आहेत. दरवर्षी वाढदिवसाच्या दिवशी आपल्या लाडक्या नायकाची एक झलक पाहता यावी यासाठी फॅन्स देशाच्या कानाकोप-यातून बिग बींच्या घराबाहेर जमतात. मात्र यंदा बिग बींचा स्पेशल वाढदिवस असतानाही फॅन्सचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कारण बिग बी यंदा वाढदिवस साजरा करणार नाहीत. खुद्द बिग बींनी सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ही पोस्ट वाचली तर बिग बींचा मूड काहीसा बिघडल्याचं लक्षात येईल. “वाढदिवस वाढदिवस काय असतं, 75 वा वाढदिवस आहे म्हणून सगळेच मागे लागले आहेत. मात्र यांत काही खास नाही. फक्त जगण्यासाठी आणखी एक नवं वर्ष मिळालं, आणखी काय ? मात्र नो सेलिब्रेशन, सोडून द्या हा विषय. कुठेच जात नाही. मी कुठेच जात नाही, मालदीवलाही नाही.” सगळीकडून हेच ऐकायला मिळत आहे. मात्र काहीच झालेलं नाही, कुठेही जाणार नाही, फक्त शांततेने कुटुंबीयांसह राहू द्या”  अशी पोस्ट बिग बींनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. बिग बी अमिताभ बच्चन मालदीवमध्ये वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी या सगळ्याचा इन्कार केला आहे. बिग बी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचं एक कारण आहे. अभिनेत्री आणि बिग बी यांची सून ऐश्वर्या राय-बच्चन हिचे वडील कृष्णराज राय यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं. त्यांच्या निधनामुळेच यंदा 75 वा वाढदिवस आणि दिवाळीचे सेलिब्रेशन करणार नाही असं बिग बी अमिताभ बच्चन यांनी या पोस्टच्या माध्यमातून जाहीर केले आहे.