Join us

​कॅटरिनाच्या बहिणीसाठी ‘इतना तो बनता है’! ‘ओ ओ जाने जाना...’ घेऊन पुन्हा येतोय सलमान खान...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 12:13 IST

‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटातील सलमान खानचे ‘ओ ओ जाने जाना...’ हे आयकॉनिक गाणे आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. या गाण्यातील सलमानचा शर्टलेस लूक पाहून अनेक तरूणींच्या हृदयाचे ठोके चुकले होते.

‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटातील सलमान खानचे ‘ओ ओ जाने जाना...’ हे आयकॉनिक गाणे आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. या गाण्यातील सलमानचा शर्टलेस लूक पाहून अनेक तरूणींच्या हृदयाचे ठोके चुकले होते. अचानक आम्हाला हे गाणे आठवण्याचे कारण म्हणजे, सलमानचे हे गाणे पुन्हा एकदा पडद्यावर जिवंत होणार आहे. केवळ इतकेच नाही तर पुन्हा एकदा सलमान या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे आणि कॅटरिना कैफची बहीण इसाबेल कैफ व सूरज पांचोली त्याला साथ देणार आहेत. आता हा काय मामला आहे, हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच. होय, इसाबेल आणि सूरजच्या आगामी ‘टाईम टू डान्स’ या चित्रपटात ‘ओ ओ जाने जाना...’ हे गाणे रिक्रिएट केले जाणार आहे व या गाण्यात सलमानचा स्पेशल अपीअरन्स असणार आहे.‘ओ ओ जाने जाना...’ हे ओरिजनल गाणे कमाल खान यांनी गायले होते आणि जतीन - ललीत यांनी कम्पोज्ड केले होते. या गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जनही कमाल खान गाणार आहे.   सलमान, इसाबेल व सूरज अशा तिघांवर हे गाणे चित्रीत होईल.  या रिक्रिएटेड व्हर्जनमध्ये सलमान पुन्हा एकदा शर्टलेस अवतारात दिसेल अशी अपेक्षा करूया.   ‘टाईम टू डान्स’ हा चित्रपट इसाबेलचा डेब्यू सिनेमा आहे. सलमानच्या पुण्याईनेचं इसाबेलला हा चित्रपट मिळाला, हे आता लपून राहिलेले नाही. कॅटरिनाची मर्जी सांभाळण्यासाठी इसाबेलचे करिअर मार्गी लावण्याचा सगळा जिम्मा सलमानने आपल्या खांद्यावर घेतलायं म्हणे. कदाचित त्यामुळेच इसाबेलच्या चित्रपटात ‘ओ ओ जाने जाना...’ करण्यास सलमान राजी झाला असावा. आता सलमानचे हे प्रयत्न किती फळास येतात आणि इसाबेलला यामुळे किती फायदा होतो, ते बघूच. ‘टाईम टू डान्स’  या चित्रपटात इसाबेल ही सूरज पांचोलीसोबत रोमान्स करताना दिसेल. या चित्रपटात इसाबेल  बॉल रूम व लॅटिन डान्सरच्या भूमिकेत आहे तर सूरज एका स्ट्रीट डान्सरच्या रूपात. कोरिओग्राफी आणि दिग्दर्शक रेमो डिसूजाचा सहाय्यक स्टेनली डिकोस्टा हा चित्रपट दिग्दर्शित करतो आहे. अर्थात यात रेमोचाही सहभाग आहे. होय, या चित्रपटाची कथा रेमोने लिहिली आहे. पुढील महिन्यात ‘टाईम टू डान्स’चे शूटींग सुरू होईल.