Join us
Daily Top 2Weekly Top 5

तर 'या' कामात बिझी आहे जान्हवी कपूर, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 07:15 IST

२०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल. ‘कलंक’ या सिनेमानंतर ‘तख्त’ हा करण जोहरचा दुसरा पीरियड ड्रामा असेल.

अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी सिनेमांसाठी जोमाने तयारीला लागली आहे. बॉलीवूडच्या चांदनी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची कन्या असलेल्या जान्हवीने पहिल्याच सिनेमातून साऱ्यांनाच प्रभावित केलं. त्यामुळे धडकच्या यशानंतर ती बॉलीवुडचा डॅडी दिग्दर्शक करण जोहरच्या 'तख्त' सिनेमात जान्हवी प्रमुख भूमिका साकारणार आहे. मुघल साम्राज्यावर आधारित या मेगा सिनेमात अनेक बडे स्टार कलाकार भूमिका साकारणार आहेत. रणवीर सिंह, करीना कपूर, आलिया भट, अनिल कपूर, विक्की कौशल यांच्या या सिनेमात भूमिका आहेत. हा सिनेमा मुघल साम्राज्यावर आधारित असल्याने सिनेमातील कलाकारांना ऊर्दू भाषा शिकावी लागणार आहे. यांत जान्हवी जैनाब्दी महल ऊर्फ हिराबाई बी भूमिका साकारणार आहे.

यासाठी जान्हवी आता ऊर्दूचे धडे घेत असून या भाषेतील संवादफेकीवर ती बरीच मेहनत घेत आहे. इतकंच नाही तर तिला काही काही पुस्तकंसुद्धा वाचण्यासाठी देण्यात आली आहेत. 'औरंगजेब- द मॅन अँड द मिथ' आणि 'स्टोरीओ दो मोगोर ही बड्या इंग्रजी साहित्यिकांची पुस्तकं ती वाचत आहे.  २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल. ‘कलंक’ या सिनेमानंतर ‘तख्त’ हा करण जोहरचा दुसरा पीरियड ड्रामा असेल.

 ‘तख्त’ या पीरियड ड्रामात अर्थात ऐतिहासिक चित्रपटात मुघल शासनकाळातील एक कथा दाखवली जाईल. राजसिंहासनावरचे प्रेम आणि ते मिळवण्यासाठीची वाट्टेल त्या स्तराला जाण्याचे मनसुबे असे याचे कथानक असेल. शहाजहान आणि मुमताज यांच्या दोन मुलांच्या अर्थात दोन भावंडांमधील सिंहासनासाठीच्या वादाची कथा यात दिसेल. जान्हवी रणवीर सिंगच्या प्रेयसीची तर करीना त्याच्या बहिणीच्या भूमिकेत असेल. आलिया भट्ट विकी कौशलच्या पत्नीची भूमिका साकारणार आहेत.

टॅग्स :जान्हवी कपूरकरण जोहरतख्त