Join us

तर हे बघून आमिर खान निवडतो चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:26 IST

अमीर खान नुकताच आपल्या आगामी चित्रपट सीक्रेट सुपरस्टारच्या प्रमोशनसाठी दिल्लीला पोहोचला. त्यावेळी तो नवीन चालीरिती बद्दल बोलाला "असे नाही ...

अमीर खान नुकताच आपल्या आगामी चित्रपट सीक्रेट सुपरस्टारच्या प्रमोशनसाठी दिल्लीला पोहोचला. त्यावेळी तो नवीन चालीरिती बद्दल बोलाला "असे नाही आहे की मला नवीन विषय हाताळायला आवडत नाही किंवा मला त्याबद्दल अभ्यास करायचा नाही आहे पण चित्रपट निवडताना  मी माझ्या मनाचा आवाज ऐकतो"तो पुढे म्हणाला मला नाही वाटत की मी असा व्यक्ती आहे की  जो सध्या चालू असलेल्या परिस्थिती शी प्रभावित होईल एक अभिनेता आणि निर्माता च्या नात्याने मी असा विषय निवडतो की जो प्रेक्षकांच्या मनात घर करेल अश्याच विषयाला मी वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत असतो.जगभरात हिट ठरलेला दंगल असो पिके असो किंवा थ्री इडियट असो प्रत्येक वेळेस वेगळे वेगळे विषय आणि रूप घेऊन येणारा अमीर खान चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाला " मी एक रचनात्मक विश्वा शी जोडलेला आहे , वेगळे वेगळे विषय माझ्या समोर येतात ते सगळेच विषय मला प्रभावित करतात मी जास्तकरून सध्या असलेली परिस्थिती शी मिळते जुळते विषय चित्रपट निर्मिती साठी निवडतो सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली एनसीआर मध्ये झालेल्या प्रदूषणाचा अहवाल देत दिवाळीत फटाक्यांवर बंदी आणली आहे काही लॉग त्याचे समर्थन करत आहे तर काही त्याच्या विरुद्ध आहेतडिजिटल लॉयलटी च्या पीव्हीआर लाँच च्या वेळेस  आमिर खान ला ह्या बद्दल विचारले असता तो म्हणाला " मी आधी पासूनच जास्त फटाके वाजवत नाही कारण मला त्यांचा मोठा आवाज आणि प्रकाश ह्याची भीती वाटत होती आणि अजूनही वाटते.मी दरवर्षी दिवाळी माझ्या कुटुंबाबरोबर आणि मित्रा बरोबर साजरी करतो, ह्याच निमित्ताने आम्ही सगळे जण एकत्र येतो" तो पुढे म्हणाला " मी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो मी प्रार्थना करतो की ही दिवाळी आपणास सुख समृद्धी ची आणि भरभराटीची जाओ आणि आशा करतो की माझा सीक्रेट सुपरस्टार तुम्हाला पसंद पडेल.