तर... आमिर खानची मुलगी इरा लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पर्दापण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2016 20:55 IST
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खानने आपल्या मुलांच्या चित्रपटातील पर्दापणाचा खुलासा केला आहे. आमिर म्हणाला, जर माझी ...
तर... आमिर खानची मुलगी इरा लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पर्दापण!
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खानने आपल्या मुलांच्या चित्रपटातील पर्दापणाचा खुलासा केला आहे. आमिर म्हणाला, जर माझी मुले प्रतिभावंत असतील तरच त्यांना सिने जगतामध्ये प्रवेश देण्यासाठी मदत करेल. त्याने एका प्रश्नाच्या उत्तरात ईराचा उल्लेख करीत ती माझ्या मार्गावर आहे असे सांगितले. आमिर म्हणाला, जुनैद सध्या थिअटरचे शिक्षण घेत आहे. त्याला रंगमंचाविषयी विशेष आकर्षण आहे. तर इराला पुढील शिक्षण करू इच्छित नाही ती माझ्या मार्गावर आहे. बॉलिवूडमध्ये मुलांच्या प्रवेशासाठी मदत करणार का? या प्रश्नाच्या उत्तरात आमिर म्हणाला, मी त्यांची मदत करेल. त्यांच्यात प्रतिभा व ते या क्षेत्रासाठी योग्य आहेत, असे जेव्हा मला वाटेल तेव्हा मी त्यांची निश्चितच मदत करेल. जर ते यासाठी फिट नसतील तर मी त्यांना सांगेन की तुम्ही यासाठी योग्य नाहीत. त्यांची मदत मला करता येणार नाही. आमिरला तीन मुले असून पहिला पत्नी रिनापासून त्याला जुनैद व इरा ही दोन मुले आहेत. जुनैदने राजकुमार हिरानी यांच्या पीके या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. तर त्याची मुलगी इरा सध्या दंगलच्या प्रमोशन करताना दिसत आहे. ‘मामी फिल्म फेस्टिव्हल’मध्ये दोघेही बाप-लेकी एकत्र दंगलचे प्रमोेशन करताना दिसले होते. आमिर खान आपल्या कलाकृतीमध्ये परफेक्शन असावे असा त्याचा आग्रह असतो. आमिर स्वत: चांगला अभिनेता आहे. आपल्या चित्रपटातून त्याने हे सिद्ध करून दाखविले आहे. लवकर आमिर खानची मुख्य भूमिका असलेला ‘दंगल’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटासाठी त्याने तब्बल दोन वर्षे मेहनत घेतली आहे. तरुणपणातील पहेलवान ते मध्यमवयात असलेला गृहस्थ साकारण्यासाठी त्याने आपले वजन चांगलेच वाढविले होते. दंगलच्या प्रमोशनासाठी एका कार्यक्रमात आलेला आमिरने त्याच्या मुलांच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत खुलासा केला हे तेवढेच खरे.